मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात रक्तदानाचा महायज्ञ४८ केंद्रांवर विक्रमी ५,२४८ रक्तपिशव्यांचे संकलन

Date:

पुणे: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६व्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान महायज्ञाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील २६ मंडलांमध्ये एकाच वेळी उभारण्यात आलेल्या ४८ रक्तदान केंद्रांवर तब्बल ५,२४८ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आलेला हा उपक्रम पुणे शहरातील सर्वांत मोठ्या रक्तदान उपक्रमांपैकी एक ठरला.

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर या रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. राज्यातील विविध रुग्णालये आणि रक्तपेढ्यांमध्ये जाणवणारा रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून एक लाख रक्तपिशव्या संकलित करण्याचा संकल्प पक्षाने केला आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे शहर भाजपने विविध भागांत रक्तदान शिबिरे आयोजित केली.

पुणे शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस केवळ उत्सवी स्वरूपात साजरा न करता समाजोपयोगी सेवाकार्यातून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. संकलित करण्यात आलेले रक्त शहरातील विविध रक्तपेढ्यांना देण्यात येणार असून, त्यामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शिबिरांमध्ये युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. प्रत्येक केंद्रावर रक्तदात्यांसाठी वैद्यकीय तपासणी, प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी आणि आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बिटवाईज–मर्सिडीज बेंझ परिसरात उड्डाणपुलाची मागणी

ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र पुणे...

पोलिसांनी कानात सांगितले, ‘हे सरकार हटवा’; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

आंदोलनात फरफटत नेल्याने तोंडातून रक्त आले; दोन-तीन ठोसे बसले,...