नवी दिल्ली-सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंगमो यांनी एक्स (X) वर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात म्हटले आहे, सफदरजंग रुग्णालयाच्या अहवालानुसार, @Wangchuk66 यांची पोटॅशियमची पातळी २.९ आहे, तर कालच ती ४.३ होती. त्यांना दुसऱ्या प्रयोगशाळेत नेऊन ‘सेकंड ओपिनियन’ (दुसऱ्या तज्ज्ञाचे मत) घेण्याची परवानगीही ते देत नाहीत किंवा माझ्या उपस्थितीत रक्ताचा नमुनाही देत नाहीत, जेणेकरून मी त्याची दुसरीकडे तपासणी करून घेऊ शकेन. मी गेल्या ३ तासांपासून वाट पाहत आहे, पण त्यांनी अद्याप आमची विनंती मान्य केलेली नाही. या पारदर्शकतेच्या अभावामुळे आम्हाला संशय येत आहे; म्हणूनच आम्ही त्वरित डिस्चार्जची मागणी केली आहे, जेणेकरून आम्ही आमच्या पसंतीच्या रुग्णालयात जाऊ शकू. आम्ही गेल्या ३ तासांपासून त्यांच्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत.
वांगचुक यांच्या पत्नीची सोशल मिडियावर तक्रार
Date:

