सायबर फसवणुकीतील ३५ हजार रुपये परत

Date:

अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्या मातोश्रींची रक्कम वारजे माळवाडी पोलिसांनी मिळवून दिली

पुणे, दि. १८ जुलै : अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्या मातोश्री स्वाती शिरीष चिरमुले यांची सायबर फसवणुकीत गेलेली ३५ हजार रुपयांची रक्कम वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या सायबर पथकाने तांत्रिक तपासाद्वारे हस्तगत करून त्यांना परत केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या ७० वर्षीय स्वाती चिरमुले यांना २३ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी एमएनजीएल गॅस कनेक्शनच्या बिलासंदर्भात व्हिडिओ कॉल आला होता. कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या सूचनेनुसार त्यांनी मोबाईलवर प्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ३५ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आले.

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर विभागाकडे ऑनलाइन तक्रार केली. त्यानंतर वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या सायबर पथकाने तांत्रिक विश्लेषण करून फसवणूक झालेली रक्कम ज्या बँक खात्यात जमा झाली होती, ते खाते गोठवले. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ही संपूर्ण रक्कम स्वाती चिरमुले यांना शनिवारी परत करण्यात आली.

रक्कम परत मिळाल्यानंतर अभिनेत्री भार्गवी चिरमुले आणि त्यांच्या मातोश्रींनी वारजे माळवाडी पोलिसांचे आभार मानले. वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी व सायबर पथकाचे प्रभारी पोलीस उप निरीक्षक संजय नरळे पोलीस अंमलदार रविंद्र गाडे, शशिकांत गोहिणे पथकाने ही कारवाई केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे शहरात जमावबंदी; ही तर सरकारची दंडेलशाही

दिल्लीतील सोनम वांगचूक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस सरकारी दंडेलशाही...

आधार ॲपने ओलांडला 4 कोटी डाउनलोड्सचा टप्पा, डिजिटल ओळख सेवांच्या सुलभ वापराला चालना

आधार ॲप वापरून सुमारे 49 लाख रहिवाशांनी आपला मोबाईल नंबर तर 11.65 लाख...

पुण्यात वीजचोरांवर महावितरणचा प्रहार

१२८१ वीजचोरांवर कारवाई; ८१ लाखांचा दंड पुणे, १८ जुलै २०२६ : महावितरणकडून वीजचोरांवर वेळोवेळी कारवाई...