पुण्यात वीजचोरांवर महावितरणचा प्रहार

Date:

१२८१ वीजचोरांवर कारवाई; ८१ लाखांचा दंड

पुणे१८ जुलै २०२६ : महावितरणकडून वीजचोरांवर वेळोवेळी कारवाई करण्यात येतेच. परंतु, मागील पंधरा दिवसांत पुणे परिमंडलात धडक मोहीम राबवून १२८१ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली आहे. या वीजचोरांना ३४०७३० युनिट वीज चोरी केल्यापोटी ८१ लाख ५५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला असून, जे दंड भरणार नाहीत त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचे महावितरणने सांगितले आहे.

भारतीय विद्युत अधिनियम २००३ अंतर्गत कलम १३५ व १३८ अन्वये मीटरमध्ये फेरफार करुन अथवा वीज यंत्रणेद्वारे थेट आकडा किंवा केबल टाकून वीजचोरी करणाऱ्यांवर महावितरण कारवाई करते. तसेच विजेचा वेगळ्या कारणांसाठी वापर केल्यास कलम १२६ अंतर्गत दंड ठोठावण्यात येतो.

महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत वीजचोरांवर धडक मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी संपूर्ण परिमंडलात धडक मोहीम राबविली. ज्यामुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.

रास्तापेठ शहर मंडलात अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या नेतृत्वाखाली १ ते १६ जुलै दरम्यान राबविलेल्या मोहिमेत ३७५ ठिकाणी वीजचोरी आढळून आली. या वीजचोरांनी ९०७९९ युनिटची चोरी केली. त्यापोटी त्यांना २३ लाख ३० हजार ८८० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

पुणे ग्रामीण मंडलात अधीक्षक अभियंता सुरेश सवाईराम यांनी राबविलेल्या मोहिमेत ५८० वीजचोरांवर १३६९३० युनिटची वीजचोरी केल्याप्रकरणी २९ लाख ८२ हजार ६६० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

तर गणेशखिंड शहर मंडलात अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांनी धडक मोहीम राबवून ३२६ वीजचोरांवर कारवाई केली. या वीजचोरांनी ११३००१ युनिटची चोरी केली. त्यांना २८ लाख ४२ हजार १९० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

चालू आर्थिक वर्षांत २२८३ वीजचोरांना ७ कोटी ६१ लाखांचा दंड

एप्रिल ते जुलै या महिन्यात पुणे परिमंडलात सातत्याने राबविलेल्या वीजचोरी विरोधी धडक मोहीमेत २२८३ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. या वीजचोरांनी ८७४५५९ युनिटची चोरी केली. महावितरणने त्यांना ७ कोटी ६१ लाख ३१ हजार ६९० रुपयांचा दंड आकारुन अद्दल घडवली आहे.

महावितरणचे आवाहन

वीज ही राष्ट्रीय संपत्ती असून, त्याची चोरी करणे कायद्याने गुन्हा आहे. दंडा सोबत कारवासाची तरतूदही वीज कायद्यात आहे. तसेच वीजचोरी करताना जिविताला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे नागरिकांनी नियमानुसार अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आधार ॲपने ओलांडला 4 कोटी डाउनलोड्सचा टप्पा, डिजिटल ओळख सेवांच्या सुलभ वापराला चालना

आधार ॲप वापरून सुमारे 49 लाख रहिवाशांनी आपला मोबाईल नंबर तर 11.65 लाख...

पुणे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'तीन उन्नत मार्गांमुळे पुण्याची वाहतूक कोंडी व प्रदूषणाचा प्रश्न...

पुण्यात ४० हजार चौरस फुटांवरील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर

कोंढवा बुद्रुक, लोहगाव, कल्याणीनगर आणि वाघोली परिसरात महापालिकेची धडक...