झाडणकामाच्या कंत्राटदारांना आता आठ टक्के ‘देखरेख शुल्क’

Date:

महापालिकेचा निर्णय; मासिक देयकाच्या १० ऐवजी आठ टक्के रक्कम देणार

पुणे : शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या झाडणकामाच्या प्रायोगिक प्रकल्पातील कंत्राटदारांना कामाच्या देखरेखीसाठी देण्यात येणारे शुल्क कमी करण्यात येणार आहे. कंत्राटदारांच्या मासिक देयकाच्या १० टक्क्यांऐवजी आठ टक्के रक्कम ‘देखरेख शुल्क’ म्हणून देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार हा बदल करण्यात आला आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याबरोबरच कचऱ्याबाबतच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी महापालिकेने तीन महिन्यांचा झाडणकामाचा प्रायोगिक प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत झाडणकामासाठी कंत्राटी पद्धतीने अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या प्रायोगिक प्रकल्पात नगररोड-वाघोली, येरवडा-वडगावशेरी, ढोले पाटील रस्ता, कोथरूड-बावधन, औंध-बाणेर, छत्रपती शिवाजीनगर-घोले रस्ता, सिंहगड रस्ता, धनकवडी-कात्रज-आंबेगाव, वारजे-कर्वेनगर, हडपसर-मांजरी, वानवडी, कोंढवा-उंड्री, कसबा पेठ, बिबवेवाडी आणि आंबेगाव या क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश आहे.

या भागांमध्ये झाडणकामासाठी वाढीव मनुष्यबळ उपलब्ध करून देताना संबंधित कंत्राटदारांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी मासिक देयकाच्या १० टक्के रक्कम देण्याचा प्रस्ताव यापूर्वी स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. त्यास समितीने मान्यताही दिली होती. मात्र, प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी सादर करताना अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी या शुल्काचा दर १० टक्क्यांवरून आठ टक्के करण्याची सूचना केली.

त्यानुसार महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सुधारित प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला. या प्रस्तावाला समितीने मंजुरी दिल्याने आता झाडणकामाच्या कंत्राटदारांना त्यांच्या मासिक देयकाच्या आठ टक्के रक्कमच कामाच्या देखरेखीसाठी मिळणार आहे. त्यामुळे प्रायोगिक प्रकल्पाच्या खर्चात काही प्रमाणात बचत होण्याची शक्यता आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रत्येक अंगणवाडीसाठी २० बाय २५ फुटांची जागा देणार

स्वच्छतागृह, स्नानगृह आणि स्वयंपाकघराचीही व्यवस्था ;श्रीनाथ भिमाले पुणे : पुणे...

राजीव गांधीनगरमध्ये ‘मॉडेल स्कूल’चा मार्ग मोकळा

चार एकर जागेवर पहिली ते बारावीपर्यंत इंग्रजी माध्यमाची शाळा;...

नवजात बालकांसाठी महापालिका रुग्णालयांत ४ कोटींची यंत्रसामग्री

१० व्हेंटिलेटर, १० सीपीएपी मशीनची तातडीने खरेदीचा मार्ग मोकळा...

१८२२ वीजचोरांना महावितरणचा दणका; ६.१५ कोटींचा दंड,२५लाख ८९ हजार युनिट वीजचोरी उघड

पुणे, दि. ३ सप्टेंबर २०२६ : वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध महावितरणने धडक मोहीम सुरू ठेवली असून, एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या पाच महिन्यांत पुणे परिमंडलातील पुणे ग्रामीण, गणेशखिंड शहर आणि रास्तापेठ शहर मंडलात १८२२ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली असून, त्यांनी २५ लाख ८९ हजार ९५० युनिट वीजचोरी केल्याचे उघड झाले आहे. या सर्व वीजचोरांना ६ कोटी १५ लाखांचा दंड महावितरणने ठोठावल्याने वीजचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. भारतीय विद्युत अधिनियम २००३ मधील कलम १३५ व १३८ अन्वये मीटरमध्ये फेरफार करून अथवा वीज यंत्रणेद्वारे थेट आकडा किंवा केबल टाकून वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणकडून कारवाई करण्यात येते. मोठ्या वीजचोरीच्या प्रकरणांमध्ये चाकण एमआयडीसी उपविभागातील ‘व्यंकटेश इंडस्ट्रीजने (न्यू मल्हार इंडस्ट्रीज)’ ७४९२२ युनिट वीजचोरी केल्याचे आढळून आले. त्यास १६ लाख १६ हजार रुपये तर चाकणमधीलच ‘संत कृपा एंटरप्रायझेसला’ ३८६६८ युनिटसाठी १५ लाख २२ हजारांचा दंड आकारण्यात आला. हडपसर औद्योगिक उपविभागातील ‘द चेअरमन पार्क इन्फिनिया’ येथे ४७८६७ युनिट वीजचोरीसाठी १६ लाख २९ हजार रुपये, गणेशखिंड उपविभागातील ‘मिहिर एंटरप्रायझेस’ला  ४७२९० युनिटसाठी १३ लाख ५२ हजार रुपये दंडाची आकारणी झाली. मंचर उपविभागातील ‘नवनाथ रंगनाथ बांगर’ या ग्राहकाने ३८४६८ युनिट वीजचोरी केल्याचे आढळून आले. या ग्राहकाला ४ लाख १९ हजार रुपयांचा दंड लावला आहे. राजगुरुनगर उपविभागातील ‘भाग्यश्री राजेंद्र भालेराव’ या ग्राहकाला ३३३२१ युनिटसाठी ८ लाख ३ हजार रुपये, हडपसर उपविभागातील ‘माधुरी दिनेश शिवरकर’ ला ३२७१० युनिटसाठी ३ लाख ७३ हजार रुपये आणि ‘दिनेश मारुती शिवरकर’ ग्राहकाकडे १८४४० युनिट वीजचोरी आढळून आल्याने त्यास ४ लाख ३२ हजार रुपये, ‘मिनिनाथ मारुती सावंत’ यास २४७९१ युनिटसाठी २ लाख ६८ हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात आली. याशिवाय औंध उपविभागातील ‘अक्षय विश्वनाथ निकाळजे’ ग्राहकाची २१५८३ युनिट वीजचोरी सापडली त्यांना २ लाख ४९ हजार रुपये दंडाचा फटका बसला. महावितरणचे आवाहन वीज ही राष्ट्रीय संपत्ती असून तिची चोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. वीजचोरीच्या प्रकरणात दंडासोबतच कारावासाचीही तरतूद वीज कायद्यात आहे. तसेच, वीजचोरी करताना जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी नियमानुसार अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.