राजीव गांधीनगरमध्ये ‘मॉडेल स्कूल’चा मार्ग मोकळा

Date:

चार एकर जागेवर पहिली ते बारावीपर्यंत इंग्रजी माध्यमाची शाळा; ६२ कोटींचा खर्च, अत्याधुनिक सुविधांचा समावेश

पुणे : राजीव गांधीनगर येथील महापालिकेच्या सुमारे चार एकर जागेवर ‘मॉडेल स्कूल’च्या धर्तीवर अद्ययावत शाळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या शाळेच्या बांधकामासाठी ६२ कोटी २१ लाख रुपयांचे पूर्वगणनपत्रक तयार करण्यात आले असून, अतिरिक्त ६१ कोटी ९१ लाख ३० हजार रुपयांचे आर्थिक दायित्व स्वीकारण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी ही माहिती दिली.

प्रभाग क्रमांक ३९-क मधील सर्वे क्रमांक ६६० येथील ही जागा शाळेसाठी आरक्षित असून, सध्या येथे कोणतेही बांधकाम नाही. परिसरातील नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून या ठिकाणी ई-लर्निंग शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, महापालिकेच्या सन २०२६-२७च्या अंदाजपत्रकात या कामासाठी केवळ ३० लाख रुपयांची तरतूद आहे. त्यामुळे उर्वरित निधी उपलब्ध करून देण्यासाठी अतिरिक्त आर्थिक दायित्व स्वीकारण्याचा प्रस्ताव आयुक्त नवल किशोर राम यांनी स्थायी समितीमार्फत मुख्य सभेसमोर ठेवला होता.

प्रस्तावित शाळेत पहिली ते बारावीपर्यंत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण दिले जाणार आहे. सुमारे ३० वर्गखोल्या, तीन प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष, कलादालन आणि सभागृह अशा सुविधा असतील. विद्यार्थ्यांसाठी जलतरण तलाव आणि विविध खेळांसाठी मैदानाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. या शाळेचा सुमारे एक हजार ते दीड हजार विद्यार्थ्यांना लाभ होण्याची शक्यता आहे.

शाळेच्या इमारतीत आवश्यकतेनुसार पीसीसी, एम-२५ काँक्रीटचे खांब, वीट बांधकाम, प्लास्टर, ग्रॅनाइट, कोटा स्टोन फरशी, पत्र्याचे शेड, ट्रस रूफ, रंगकाम आणि फर्निचरची कामे केली जाणार आहेत. जलतरण तलाव आणि भूमिगत पाण्याची टाकीही उभारण्यात येणार आहे. तज्ज्ञ सल्लागारांच्या माध्यमातून शिक्षण मंडळाच्या आवश्यकतेनुसार इमारतीचे नियोजन करण्यात आले आहे.

उर्वरित ६१ कोटी ९१ लाख ३० हजार रुपयांचा निधी पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने उपलब्ध केला जाणार आहे. २०२७-२८ मध्ये २० कोटी, २०२८-२९ मध्ये २१ कोटी ९१ लाख ३० हजार आणि २०२९-३० मध्ये २० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ७२ नुसार या आर्थिक दायित्वासाठी मुख्य सभेची मंजुरी घेण्यात येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नवजात बालकांसाठी महापालिका रुग्णालयांत ४ कोटींची यंत्रसामग्री

१० व्हेंटिलेटर, १० सीपीएपी मशीनची तातडीने खरेदीचा मार्ग मोकळा...

१८२२ वीजचोरांना महावितरणचा दणका; ६.१५ कोटींचा दंड,२५लाख ८९ हजार युनिट वीजचोरी उघड

पुणे, दि. ३ सप्टेंबर २०२६ : वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध महावितरणने धडक मोहीम सुरू ठेवली असून, एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या पाच महिन्यांत पुणे परिमंडलातील पुणे ग्रामीण, गणेशखिंड शहर आणि रास्तापेठ शहर मंडलात १८२२ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली असून, त्यांनी २५ लाख ८९ हजार ९५० युनिट वीजचोरी केल्याचे उघड झाले आहे. या सर्व वीजचोरांना ६ कोटी १५ लाखांचा दंड महावितरणने ठोठावल्याने वीजचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. भारतीय विद्युत अधिनियम २००३ मधील कलम १३५ व १३८ अन्वये मीटरमध्ये फेरफार करून अथवा वीज यंत्रणेद्वारे थेट आकडा किंवा केबल टाकून वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणकडून कारवाई करण्यात येते. मोठ्या वीजचोरीच्या प्रकरणांमध्ये चाकण एमआयडीसी उपविभागातील ‘व्यंकटेश इंडस्ट्रीजने (न्यू मल्हार इंडस्ट्रीज)’ ७४९२२ युनिट वीजचोरी केल्याचे आढळून आले. त्यास १६ लाख १६ हजार रुपये तर चाकणमधीलच ‘संत कृपा एंटरप्रायझेसला’ ३८६६८ युनिटसाठी १५ लाख २२ हजारांचा दंड आकारण्यात आला. हडपसर औद्योगिक उपविभागातील ‘द चेअरमन पार्क इन्फिनिया’ येथे ४७८६७ युनिट वीजचोरीसाठी १६ लाख २९ हजार रुपये, गणेशखिंड उपविभागातील ‘मिहिर एंटरप्रायझेस’ला  ४७२९० युनिटसाठी १३ लाख ५२ हजार रुपये दंडाची आकारणी झाली. मंचर उपविभागातील ‘नवनाथ रंगनाथ बांगर’ या ग्राहकाने ३८४६८ युनिट वीजचोरी केल्याचे आढळून आले. या ग्राहकाला ४ लाख १९ हजार रुपयांचा दंड लावला आहे. राजगुरुनगर उपविभागातील ‘भाग्यश्री राजेंद्र भालेराव’ या ग्राहकाला ३३३२१ युनिटसाठी ८ लाख ३ हजार रुपये, हडपसर उपविभागातील ‘माधुरी दिनेश शिवरकर’ ला ३२७१० युनिटसाठी ३ लाख ७३ हजार रुपये आणि ‘दिनेश मारुती शिवरकर’ ग्राहकाकडे १८४४० युनिट वीजचोरी आढळून आल्याने त्यास ४ लाख ३२ हजार रुपये, ‘मिनिनाथ मारुती सावंत’ यास २४७९१ युनिटसाठी २ लाख ६८ हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात आली. याशिवाय औंध उपविभागातील ‘अक्षय विश्वनाथ निकाळजे’ ग्राहकाची २१५८३ युनिट वीजचोरी सापडली त्यांना २ लाख ४९ हजार रुपये दंडाचा फटका बसला. महावितरणचे आवाहन वीज ही राष्ट्रीय संपत्ती असून तिची चोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. वीजचोरीच्या प्रकरणात दंडासोबतच कारावासाचीही तरतूद वीज कायद्यात आहे. तसेच, वीजचोरी करताना जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी नियमानुसार अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

विद्यानंद बापट मारहाण प्रकरणाचे राजकीय पडसाद; सत्ताधारी-विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया

संतोष चव्हाणला अटक; एकनाथ शिंदेंचे संयमाचे आवाहन, सुप्रिया सुळे-यशोमती...

‘या झुंडशाहीची दहशत वेळीच मोडून काढा’; विद्यानंद बापट मारहाण प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले

हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर हल्लाबोल; मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘मतभेद असू...