नवजात बालकांसाठी महापालिका रुग्णालयांत ४ कोटींची यंत्रसामग्री

Date:

१० व्हेंटिलेटर, १० सीपीएपी मशीनची तातडीने खरेदीचा मार्ग मोकळा – श्रीनाथ भिमाले
पुणे
–

महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय, राजीव गांधी रुग्णालय आणि चंदुमामा सोनवणे प्रसूतिगृहातील नवजात अतिदक्षता विभागांसाठी (एनआयसीयू) १० नवीन व्हेंटिलेटर आणि १० सीपीएपी मशीन खरेदी करण्यात येणार आहेत. या यंत्रसामग्रीसाठी तब्बल ३ कोटी ९८ लाख ५० हजार रुपयांचा खर्चाला मंजूरी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्थायी समितीसमोर ठेवला होता. प्रस्तावाला मान्यात दिल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

महापालिका रुग्णालयांमध्ये नवजात बालकांसाठी आवश्यक असलेल्या व्हेंटिलेटरची कमतरता असल्याने गंभीर अवस्थेतील बालकांना अनेकदा ससून रुग्णालयात संदर्भित करावे लागते. त्यामुळे पालक आणि नातेवाईकांची धावपळ होण्याबरोबरच महापालिका रुग्णालयांच्या सुविधांबाबत नाराजी व्यक्त केली जाते. खासगी रुग्णालयांमधील उपचाराचा वाढता खर्च लक्षात घेता महापालिका रुग्णालयांमध्येच अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज प्रशासनाने प्रस्तावात व्यक्त केली होती.

कमला नेहरू रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी दोन्ही प्रकारच्या यंत्रांची मागणी केली आहे. मात्र, निविदा काढून खरेदी प्रक्रिया राबविल्यास सुमारे एक महिन्याचा कालावधी लागू शकतो. नवजात बालकांच्या उपचाराची तातडीची गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ६७(३)(क) अंतर्गत निविदा प्रक्रिया न राबविता थेट कोटेशनच्या आधारे खरेदी करण्याचे प्रशासनाने प्रस्तावित केले आहे.
सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पातील उपकरणे व यंत्रसामग्रीसाठीच्या १० कोटी रुपयांच्या तरतुदीतून ३ कोटी ९८ लाख ५० हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यासाठी करारनामा करून देयके अदा करण्यास स्थायी समितीची मंजुरी मागण्यात आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार! अभिनेता सुरक्षित, हल्लेखोरांचा शोध सुरू

दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून गोळीबार झाल्याचे वृत्त; चालकासह दोघे जखमी...

श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे आयोजित आरोग्य शिबीरात ३५० महिलांची तपासणी

नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर ; श्री महालक्ष्मी...

महाराष्ट्रात पुन्हा वादळी पावसाचे सावट! कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात यलो अलर्ट

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगलीसह अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची...

पुण्यात ऑक्टोबर हीटचा तडाखा! पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; तापमान ३४ अंशांवर

पुणेकर उकाड्याने हैराण; पुढील दोन दिवसही तापमान ३३ ते...