पुण्यात ५.७९ कोटींचे २.८९५ किलो एमडी जप्त, सराईत आरोपी अटकेत

Date:

पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथक-१ ने मोठी कारवाई करत तब्बल ५ कोटी ७९ लाख रुपयांचे २ किलो ८९५ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. या प्रकरणी सराईत आरोपी प्रशांत सुरेश सावंत (वय ३८) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून अंमली पदार्थांसह इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ड्रग्ज फ्री पुणे’ अभियानांतर्गत अंमली पदार्थांची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. त्यानुसार अंमली पदार्थविरोधी पथक-१ रात्री गस्त घालत असताना कात्रज चौक परिसरातील आयएसआयएससी पुलाखाली, सावंत कॉर्नरजवळ संशयित हालचाली करणाऱ्या व्यक्तीची तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान आरोपीकडून २ किलो ८९५ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. या मालाची अंदाजे किंमत ५ कोटी ७९ लाख रुपये असून इतर साहित्यांसह जप्ती करण्यात आली आहे.

या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६८/२०२६ दाखल करण्यात आला असून एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क) व २१(क) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास अंमली पदार्थविरोधी पथक-१ चे पोलीस उपनिरीक्षक योगेश कोतेकर करीत आहेत.

ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थविरोधी पथक-१ ने यशस्वीरीत्या पार पाडली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बालवडकर परिवाराची वारकरी सेवेची ३२ वर्षे! १९ बसेस मधून १९ बसेस विठूमाउलीच्या दर्शनाला रवाना

पाहतां समचरणाची शोभा |अवघा जगी #विठ्ठल ऊभा ||विठ्ठले लावियले...

“राम नाम जपना, पराया माल अपना” हेच भाजप चे धोरण – काँग्रेस’ची प्रखर टीका

राम मंदिर चोरी-दरोड्या बाबत जाब विचारणे, बदनामी नव्हे.. तर...