बालवडकर परिवाराची वारकरी सेवेची ३२ वर्षे! १९ बसेस मधून १९ बसेस विठूमाउलीच्या दर्शनाला रवाना

Date:

पाहतां समचरणाची शोभा |
अवघा जगी #विठ्ठल ऊभा ||
विठ्ठले लावियले पिसें |
जिकडे पाहावा तिकडे दिसे ||
।। जय हरी विठ्ठल।

दरवर्षी प्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्त बालेवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजय बालवडकर, नगरसेवक अमोलभैय्या बालवडकर व राहुलदादा बालवडकर यांच्या वतीने मोफत पंढरपूर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

विठुरायांचे दर्शन घेण्यासाठी या यात्रेत १९ बसेस सहभागी झाले. माऊलीचे नामस्मरण करून मोठ्या भक्तिभावाने व पवित्र वातावरणात सदर यात्रा १९ बसेसच्या माध्यमातुन पंढरपूर नगरिकडे रवाना झाले. विठ्ठल-रखुमाईच्या गजरात संपूर्ण परिसर यावेळी दुमदुमला.
“या यात्रेच्या माध्यमातुन समस्त वारकरी संप्रदायाची सेवा गेली ३२ वर्षे आमच्या हातुन घडत असुन समस्त वारकरी मायबापांचे आशिर्वाद यातुन मिळत आहेत, तसेच सांप्रदाय क्षेत्राची हि सेवा करत असल्याचे समाधान यातुन मिळत आहे” असे यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक अमोलभैय्या बालवडकर, विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट चे अध्यक्ष संजय बालवडकर, राहुलदादा बालवडकर, श्री.ज्ञानेश्वरभाऊ तापकीर, सुनिलजी चांदेरे, प्रकाशतात्या बालवडकर, अनिल बालवडकर, वैशालीताई कमाजदार, कल्याणीताई टोकेकर, समस्त महिला भजनी मंडळ व भाविक-भक्त उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...