पालखी सोहळ्यात ८९ संशयित ताब्यात:६७ महिला, २२ पुरुष संशयितांची चौकशी सुरु

Date:

पुणे शहर गुन्हे शाखेकडून चार अँटी-चेन स्नॅचिंग पथके तैनात,चेन स्नॅचिंग रोखण्यासाठी गुन्हे शाखेची कारवाई

पुणे | प्रतिनिधी

संत श्री जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेतली असून, चेन स्नॅचिंगसारखे प्रकार रोखण्यासाठी गुन्हे शाखेकडून विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

पुणे शहरात आषाढी वारी पालखी सोहळा ९ जुलै ते १२ जुलै २०२६ या कालावधीत आगमन, मुक्काम आणि प्रस्थान अशा स्वरूपात पार पडत आहे. हा सोहळा ऐतिहासिक परंपरेचा असून पुणे शहरातील सर्वाधिक लोकप्रिय धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानला जातो. राज्यभरातून तसेच देश-विदेशातून भाविक आणि पर्यटक हा सोहळा पाहण्यासाठी पुण्यात येतात.

पालखी सोहळ्याशी लाखो भाविकांच्या भावना जोडलेल्या असल्याने आगमन, मुक्काम आणि मार्गक्रमणाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहर पोलिसांकडून योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, चेन स्नॅचिंगचे प्रकार घडू नयेत यासाठी पुणे शहर गुन्हे शाखेकडून ४ अँटी-चेन स्नॅचिंग पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यासाठी स्वतंत्र पथकही नियुक्त करण्यात आले आहे.

या पथकांनी ९ जुलै ते १२ जुलै या कालावधीत ६७ महिला आणि २२ पुरुष असे एकूण ८९ संशयित ताब्यात घेतले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते आणि पोलीस पथक त्यांच्याकडे चौकशी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पालखी बंदोबस्त पूर्ण झाल्यानंतर संशयित व्यक्तींची तसेच निष्पन्न झालेल्या आरोपींची संख्या आणि नावे जाहीर करण्यात येतील, असे पुणे शहर पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दगडूशेठ दत्त मंदिर ट्रस्टतर्फे वारकऱ्यांची आरोग्यसेवा

मोफत तपासणी, औषध वाटप, फिजिओथेरपी सेवेसह १५ हजार गुडदाणी...

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर आणि महाप्रसाद

२० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ मोफत आरोग्य तपासणी, औषध वाटप...

खडकी शिक्षण संस्थेचे ज्ञानदानाच्या कार्यात मोलाचे योगदान : मुरलीधर मोहोळ

वैदेही दत्ताजी गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन पुणे : पुण्याने...