दगडूशेठ दत्त मंदिर ट्रस्टतर्फे वारकऱ्यांची आरोग्यसेवा

Date:

मोफत तपासणी, औषध वाटप, फिजिओथेरपी सेवेसह १५ हजार गुडदाणी पाकिटांचे वाटप

पुणे, प्रतिनिधी – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसमवेत आलेल्या वारकरी भाविकांच्या सेवेसाठी कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्यावतीने विशेष वैद्यकीय सेवा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी सेवा आणि औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. याशिवाय ट्रस्टच्यावतीने वारकरी भाविकांसाठी प्रसाद म्हणून १५ हजार गुडदाणीच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले.

आषाढी वारीनिमित्त पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकरी भाविकांना पायी वारी करताना होणारा शारीरिक त्रास लक्षात घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच सांधेदुखी, स्नायूंचा त्रास आणि थकवा यासाठी फिजिओथेरपी सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. गरजू वारकऱ्यांना आवश्यक औषधांचेही मोफत वाटप करण्यात आले. या वैद्यकीय सेवा उपक्रमासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक उपस्थित होते. वारकऱ्यांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळावी यासाठी ट्रस्टतर्फे विशेष नियोजन करण्यात आले होते. या सेवाभावी उपक्रमाला वारकरी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टकडून दरवर्षी सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून भाविकांची सेवा केली जाते. यावर्षी ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष पुनीत बालन यांच्या मार्गदर्शनाखाली हा आरोग्य सेवा उपक्रम “सेवा हीच भक्ती” या भावनेतून राबविण्यात आला.

यावेळी ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त राजू बलकवडे, उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे व वर्षा थोरवे, खजिनदार सुरज थोरात, उत्सव प्रमुख नितीन पंडित, उप-उत्सव प्रमुख मनीषाताई खेडेकर, तसेच विश्वस्त पराग काळकर आणि महेंद्रशेठ गाडवे उपस्थित होते.

या उपक्रमासाठी डॉ. प्रमोद ठोंबरे, डॉ. अपूर्वा क्षीरसागर, डॉ. श्रेयस बाफना व डॉ. दिग्विजय शितोळे या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाचे मोलाचे सहकार्य लाभले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पालखी सोहळ्यात ८९ संशयित ताब्यात:६७ महिला, २२ पुरुष संशयितांची चौकशी सुरु

पुणे शहर गुन्हे शाखेकडून चार अँटी-चेन स्नॅचिंग पथके तैनात,चेन...

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर आणि महाप्रसाद

२० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ मोफत आरोग्य तपासणी, औषध वाटप...