श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर आणि महाप्रसाद

Date:

२० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

मोफत आरोग्य तपासणी, औषध वाटप आणि चरण मसाज सेवेतून वारकऱ्यांची सेवा

पुणे – आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करून पुण्यनगरीत विसाव्यासाठी थांबलेल्या वारकऱ्यांसाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वारकऱ्यांसाठी मोफत भोजन व्यवस्था, आरोग्य शिबिर, औषध वाटप तसेच चरण मसाज सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या सेवा उपक्रमाला वारकरी भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून. महाप्रसाद सेवेचा तर जवळपास २० हजार वारकऱ्यांनी लाभ घेतला.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसमवेत लाखो भाविक पुणे शहरात मुक्कामी आहेत. या वारकऱ्यांच्या सेवेसाठी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविले जातात. यंदाच्या आषाढी वारीतही “सेवा हीच साधना” या भावनेतून वारकरी भाविकांसाठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली. वारकऱ्यांचा लांब पल्ल्याचा प्रवास, पायी वारी आणि शारीरिक थकवा लक्षात घेऊन आरोग्य तपासणी व औषध वाटपाची सुविधा करण्यात आली होती.
या आरोग्य शिबिरामध्ये वारकऱ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यकतेनुसार औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी चरण मसाज सेवाही आयोजित करण्यात आली होती.

या उपक्रमासाठी ट्रस्टचे विश्वस्त, उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते. वारकरी भाविकांनी या सेवांचे कौतुक करत ट्रस्टच्या उपक्रमाचे स्वागत केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दगडूशेठ दत्त मंदिर ट्रस्टतर्फे वारकऱ्यांची आरोग्यसेवा

मोफत तपासणी, औषध वाटप, फिजिओथेरपी सेवेसह १५ हजार गुडदाणी...

पालखी सोहळ्यात ८९ संशयित ताब्यात:६७ महिला, २२ पुरुष संशयितांची चौकशी सुरु

पुणे शहर गुन्हे शाखेकडून चार अँटी-चेन स्नॅचिंग पथके तैनात,चेन...

खडकी शिक्षण संस्थेचे ज्ञानदानाच्या कार्यात मोलाचे योगदान : मुरलीधर मोहोळ

वैदेही दत्ताजी गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन पुणे : पुण्याने...