अजितदादांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करा ; चेतन तुपे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…

Date:

मुंबई दि. ९ जुलै – राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा मुख्य प्रतोद चेतन तुपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

दरम्यान स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नावाचा पद्मविभूषण (मरणोत्तर) पुरस्कारासाठीचा शिफारस प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्यावतीने केंद्रसरकारकडे तातडीने पाठवण्यात यावा अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.

२८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या अत्यंत दुर्दैवी अपघातात आपण महाराष्ट्राचे आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना गमावले. ही महाराष्ट्राची आणि देशाची न भरून निघणारी हानी आहे. अजितदादांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आणि औद्योगिक विकासाला एक नवी दिशा दिली. एक कणखर प्रशासक, अहोरात्र कष्ट करणारे लोकप्रतिनिधी आणि ‘अ‍ॅक्शन ओरिएंटेड’ नेते म्हणून त्यांनी जनमानसावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या या महान राष्ट्रसेवेचा आणि नेतृत्वाचा यथोचित सर्वोच्च गौरव म्हणून त्यांना भारत सरकारचा अत्यंत मानाचा पद्मविभूषण (मरणोत्तर) पुरस्कार जाहीर व्हावा ही महाराष्ट्रातील तमाम जनतेची आणि आमची तीव्र भावना आहे असेही चेतन तुपे यांनी म्हटले आहे.

या निवेदनात राष्ट्रीय नेतृत्व आणि पक्ष संघटना, प्रशसानावरील पकड आणि विकास, शेतकरी आणि सहकार क्षेत्राचे आधारस्तंभ, जनकल्याणाच्या योजना आदी अजितदादांच्या लोकसेवेतील ठळक पैलू मांडण्यात आले आहेत.

अजितदादांचे अचानक जाणे हे एका युगाचा अंत झाल्यासारखे आहे. अशा महान लोकनेत्याच्या अथांग परिश्रमांचा, दूरदृष्टीचा आणि जनसेवेचा मरणोत्तर सर्वोच्च सन्मान होणे हे संपूर्ण राज्यासाठी आणि देशासाठी अभिमानास्पद ठरेल असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व विधानमंडळ सदस्य उपस्थित होते

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वारकऱ्यांसाठी महावितरणची मोबाईल चार्जिंग सुविधा

योजनांच्या जनजागृतीसाठी केला चित्ररथ पुणे, दि. ९ जुलै, २०२६- आषाढी...

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना’ ज्येष्ठ कलावंतांना सन्मानाने जगण्याचा आधार

सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत १ ते ३१ जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज...

मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत खेळाडू निवड चाचणी १४ व १५ जुलै रोजी

पुणे, दि. ९: मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा प्रतिभा...