महापालिकेकडून ७५ कुटुंबांतील ३०० नागरिकांना निवारा

Date:

पुणे, दि. ६ :पुणे शहरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली असून नागरिकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. शहरातील पावसाची स्थिती, धरणांतील पाणीसाठा, साचलेले पाणी, पूरस्थिती तसेच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत २४ तास लक्ष ठेवण्यात येत असून सर्व संबंधित विभाग समन्वयाने कार्यरत आहेत.

महानगरपालिकेच्या ICCC अंतर्गत कार्यरत वेदर स्टेशनच्या माहितीनुसार, दि. ६ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत शहरातील विविध भागांत १२ मि.मी. ते ९९ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली. औंध-बाणेर (६२.६० मि.मी.), नगर रोड-वडगाव शेरी (४५.६० मि.मी.), येरवडा-कळस-धनोरी (४५ मि.मी.) आणि कोथरूड-बावधन (४१.८० मि.मी.) या भागांत तुलनेने अधिक पर्जन्यमान नोंदविण्यात आले.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांवरही सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. दि. ६ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत खडकवासला धरण ३४.३२ टक्के, पानशेत ३१.६९ टक्के, वरसगाव २९.६० टक्के, टेमघर १४.९९ टक्के, पवना ४८.७५ टक्के आणि मुळशी ३९.३७ टक्के भरले असून कोणत्याही धरणातून विसर्ग सुरू नसल्याची माहिती प्रशासनाने दिली.

पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे शहरातील काही भागांतील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. येरवडा, नगररोड, ढोले पाटील रोड आणि औंध क्षेत्रीय कार्यालय परिसरातील एकूण ७५ कुटुंबांतील सुमारे ३०० नागरिकांना सुरक्षित निवारा केंद्रांमध्ये हलविण्यात आले असून महानगरपालिकेने त्यांच्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

दि. ६ जुलै रोजी शहरात झालेल्या पावसामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे एकूण ३५ तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये प्रामुख्याने ड्रेनेज चोकअप होणे, रस्त्यांवर पाणी साचणे, झाडे व फांद्या पडणे तसेच भिंती कोसळण्याच्या घटनांचा समावेश होता. संबंधित क्षेत्रीय कार्यालये आणि अग्निशमन विभागाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बहुतांश तक्रारींचे निराकरण केले. याशिवाय शहरातील २० ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारींवरही त्वरित कार्यवाही करण्यात आली. तसेच ९ तक्रारी झाडे/फांदी पडण्याचे घटना घडलेल्या आहेत

आपत्ती व्यवस्थापन विभागाचा नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असून हवामान विभाग, जलसंपदा विभाग, वाहतूक पोलीस, अग्निशमन दल, पथ विभाग, मलनिस्सारण विभाग तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांशी सातत्याने समन्वय ठेवण्यात येत आहे. महापालिकेचे अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी संबंधित ठिकाणी उपस्थित राहून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवत आहेत.

पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री सज्ज ठेवली आहे. ४,००० सफाई कर्मचारी, ५० फवारणी कर्मचारी, १२ मुख्य आरोग्य निरीक्षक, ५० स्वच्छता निरीक्षक, ७० स्वच्छता पर्यवेक्षक यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. याशिवाय २० जेसीबी, ३५ जेटिंग मशीन, १० डीपी मशीन, १३१ कॉम्पॅक्टर, १०० घंटागाड्या, २९४ छोटी गाडी, २० बिन लिफ्टर, ७ टिपर, ३ ट्रॅक्टर, ९ पाण्याचे टँकर, ७७ डिझेल पंप, १०४ स्प्रे पंप आणि इतर आवश्यक साधनसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे.

पूरबाधित भागांसाठी शहरात एकूण ४९ मदत केंद्रे क्षेत्रीय कार्यालय स्थरावर स्थापन करण्यात आली असून आवश्यकतेनुसार नागरिकांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आपत्कालीन नियंत्रण कक्ष नागरिकांच्या सेवेसाठी २४ तास कार्यरत आहेत.

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, पुणे महानगरपालिका, हवामान विभाग व प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. नदी, नाले, ओढे, पूल, सखल भाग तसेच पाणी साचलेल्या रस्त्यांवरून प्रवास करणे टाळावे. झाडाखाली अथवा धोकादायक ठिकाणी उभे राहू नये. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ पुणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे महानगरपालिकेकडून प्रसारमाध्यमे, सोशल मीडिया तसेच विविध माध्यमांतून नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे.

आपत्कालीन संपर्क क्रमांक (२४x७):
पुणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष : ०२०-२५५०१२६९ / ०२०-२५५०६८००

आपत्ती व्यवस्थापन विभाग संपर्क अधिकारी :
श्री. गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी : ९६८९९३१५११
श्री. केदार वझे, उप अभियंता : ९६८९९३१२८७
श्री. प्रकाश कोतवाल, शाखा अभियंता : ९८५०९२०७१४

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

संकटसमयी धावून आले ‘पीएमआरडीए’चे देवदूत! मुसळधार पावसात युद्धपातळीवर बचावकार्य; शेकडो नागरिकांचे वाचवले प्राण!

मावळ, लोणावळा परिसरात दरड कोसळल्याच्या दुर्घटनांनंतर 'पीएमआरडीए'च्या 'पीडीआरएफ'कडून तात्काळ...

पुणेकरांना दिलासा; ७ जुलैपासूनची पाणीकपात ११ जुलैपर्यंत स्थगित

पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेचा निर्णय पुणे | प्रतिनिधी पुणे शहरात १५...