कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या वर्धापन दिनी महापौर आणि पोलिस आयुक्तांच्या हस्ते महाआरती

Date:

पुणे, ता. ६ : श्रीमती कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात सोमवारी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि पोलिस आयुक्त अमितेश गुप्ता यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी महापौरांनी दत्तगुरूंचे दर्शन घेत पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पुणेकरांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.

श्रीमती कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या १२९ व्या वर्धापन दिनानिमित्त महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते दत्त मंदिरात आरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना महापौर म्हणाल्या, “लहानपणापासून मी दत्त मंदिरात दर्शनासाठी येत आहे. आज दत्तगुरूंची आरती करण्याचा मान मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजते. महापौरपदाची मोठी जबाबदारी स्वीकारल्यानंतर माझ्या हातून पुणेकरांच्या हिताचे निर्णय घडावेत, तसेच यंदा समाधानकारक पाऊस होऊन शहराला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे तुडुंब भरावीत, अशी प्रार्थना मी दत्तगुरूंच्या चरणी केली आहे.”

या वेळी मंदिराचे अध्यक्ष पुनीत बालन, कार्यकारी विश्वस्त राजू बलकवडे, उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे व वर्षा थोरवे, खजिनदार सुरज थोरात, उत्सव प्रमुख नितीन पंडित, उप-उत्सव प्रमुख मनीषाताई खेडेकर, आर. एम. धारिवाल फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल-बालन तसेच विश्वस्त पराग काळकर आणि महेंद्रशेठ गाडवे उपस्थित होते.

महापौरांच्या हस्ते झालेल्या महाआरतीनंतर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दत्तगुरूंचे दर्शन घेतले.



‘‘पुणेकरांच्या संरक्षणाचं कर्तव्य बजावत असतानाच श्री दत्त महाराजांच्या दर्शनाला येण्याची अनेक दिवसांपासूनची इच्छा होती ती आज फळाला आली. त्यातही सपत्नीक आरती करण्याची संधी मिळणं ही आमच्यासाठी खरोखर भाग्याची गोष्ट आहे. याबाबत ट्रस्टचे अध्यक्ष मा. पुनीत बालन आणि संपूर्ण विश्वस्त मंडळ या सर्वांचे मनापासून आभार!’’

  • अमितेश कुमार (पोलीस आयुक्त, पुणे)
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ध्वनी तीव्रतेचा त्रास पुणेकरांना होऊ न देणे ही महापौरांची जबाबदारी…त्या तर कार्यकर्त्यांना पाठीशी घालताहेत

ध्वनी प्रदूषणावरून महापौरांवर ‘आप’चा निशाणा “कार्यकर्त्यांना पाठीशी घालण्याऐवजी कायद्याची अंमलबजावणी...

उत्सवात भक्तिभाव जागला पाहिजे, छातीत धडकी भरता कामा नये…

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सर्व...

सातव्या थरावरून चिमुकला गोविंदा खाली कोसळला; बदलापूरच्या दहीहंडीत मोठा अनर्थ टळला

सेफ्टी बेल्ट तुटल्याने दुर्घटना; माखन चोर दहीकाला उत्सवातील घटनेने...