पहिल्याच मुसळधार पावसात ‘मिसिंग लिंक’चे पितळ उघडे; स्लॅब कोसळून मुंबई–पुणे वाहतूक ठप्प

Date:

🟨 एक्स्प्रेस-वे, जुना महामार्ग आणि रेल्वे तिन्ही मार्ग विस्कळीत; दरडी, पाणी आणि वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल

पुणे | प्रतिनिधी

मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या दळणवळण व्यवस्थेला सोमवारी मुसळधार पावसाने जबरदस्त फटका बसला. मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात स्लॅब कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. त्याचवेळी जुना मुंबई–पुणे महामार्ग आणि मुंबई–पुणे रेल्वे मार्गावरही दरडी कोसळल्याने तिन्ही प्रमुख मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, खंडाळा एक्झिटजवळील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या ८.९ किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ डोंगराचा मोठा भाग कोसळला. या दरडीसोबतच बोगद्याचा सिमेंटचा स्लॅब आणि लोखंडी रॉडसह बांधकामाचा भाग रस्त्यावर कोसळल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही मार्गिका पूर्णपणे बंद झाल्या.

घटनेनंतर डोंगरावरील माती आणि पाण्याचा प्रचंड लोंढा बोगद्यातून थेट रस्त्यावर आला. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती नसली तरी, वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

दरम्यान, भोर घाटातील ठाकूरवाडी–मंकी हिल परिसरात दरडी कोसळल्याने मुंबई–पुणे रेल्वे मार्गही बंद झाला आहे. रेल्वे रुळांवर माती आणि दगड साचल्यामुळे मध्य रेल्वेला ‘डेक्कन क्वीन’, ‘सिंहगड एक्स्प्रेस’, ‘इंद्रायणी एक्स्प्रेस’सह १६ महत्त्वाच्या गाड्या रद्द कराव्या लागल्या असून अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

तसेच, अमृतांजन पूल आणि खालापूर टोलनाका परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. प्रशासनाकडून जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी, सतत पडणाऱ्या पावसामुळे कामात अडथळे निर्माण होत आहेत.

या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक कामाशिवाय मुंबई–पुणे प्रवास टाळावा तसेच प्रवासापूर्वी महामार्ग आणि रेल्वेची अद्ययावत माहिती तपासूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पार्किंग बंद, बाहेर दुचाकींवर दंड; एरंडवण्यातील व्यावसायिक इमारतीवरून खर्डेकर आक्रमक

पार्किंग तातडीने खुले करण्याची महापालिकेकडे मागणी; तोपर्यंत ग्राहकांच्या दुचाकींवर...

नेपाळ आपत्ती : पुण्यातील आठ जण सुरक्षित

एक महिला मुंबईत सुखरूप पोहोचली; कैलास पर्वत परिसरातील सात...

राज्यस्तरीय बालविकास कार्यशाळेत पुण्याच्या ‘अर्बन95’ प्रवासाचे सादरीकरण

बालक-केंद्रित शहरी नियोजनावर पुणे महापालिकेचा भर; ‘पुणे किड्स फेस्टिव्हल’मध्ये...

देशभरात NEET-PG 2026 परीक्षा संपन्न; जयपूरमधील 2,445 उमेदवारांची 5 सप्टेंबरला पुनर्परीक्षा

2.73 लाख उमेदवारांसाठी 1,111 केंद्रांवर आयोजन; 2.65 लाखांहून अधिक...