मावळच्या पाटण गावात घरावर कोसळली दरड:कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Date:

पुणे-सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे आता दुर्घटनांचे सत्र सुरू झाले आहे. आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास मावळ तालुक्यातील पाटण गावात एका घरावर डोंगरकड्यावरून मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या ढिगाऱ्याखाली संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब अडकल्याची प्राथमिक भीती व्यक्त केली जात असून, घटनास्थळी बचावकार्याला युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासन तात्काळ अलर्ट मोडवर आले आहे. पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी (DDMO) दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेची माहिती मिळताच मावळचे तहसीलदार आणि स्थानिक महसूल विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मुसळधार पाऊस आणि चिखलाचे साम्राज्य यामुळे सुरुवातीला बचावकार्यात अडथळे येत होते, मात्र स्थानिकांच्या मदतीने प्रशासनाने तातडीने मातीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू केले आहे.

एनडीआरएफचे ३० जवानांचे विशेष पथक दाखल

मातीचा आणि दगडांचा मोठा ढिगारा असल्याने स्थानिक पातळीवरील मदत अपुरी पडत होती. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पुणे येथील ५ व्या बटालियनला पाचारण करण्यात आले आहे. निरीक्षक रविंदर यांच्या नेतृत्वाखाली आणि सहाय्यक कमांडंट चंद्रकेतू शर्मा यांच्या देखरेखीखाली एनडीआरएफचे ३० सदस्यांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले. यामध्ये १ वरिष्ठ अधिकारी, २ अधिकारी आणि २७ जवानांचा समावेश आहे. हे पथक अत्यावश्यक आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव साहित्यांसह आज पहाटे ५.५० वाजताच घटनास्थळाकडे रवाना झाले असून त्यांनी आता बचावकार्याची सूत्रे हाती घेतली आहेत. सध्या पाटण गावात अत्यंत तणावपूर्ण वातावरण असून, संपूर्ण यंत्रणा ढिगाऱ्याखालील नागरिकांचा शोध घेत आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अधिकृतरीत्या कोणत्याही जीवितहानीची नोंद झालेली नाही. आत अडकलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना लवकरात लवकर आणि सुखरूप बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष आता या बचाव मोहिमेकडे लागले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिल्याच मुसळधार पावसात ‘मिसिंग लिंक’चे पितळ उघडे; स्लॅब कोसळून मुंबई–पुणे वाहतूक ठप्प

🟨 एक्स्प्रेस-वे, जुना महामार्ग आणि रेल्वे तिन्ही मार्ग विस्कळीत;...

🟥 पुणे–मुंबई द्रुतगती मार्गासह जुना महामार्ग वाहतुकीसाठी बंद

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या हजारो कोटींच्या 'मिसिंग लिंक' प्रकल्पावर दरड...