मुंबईत १० तासांत विक्रोळीमध्ये सर्वाधिक २४६.६ मिमी पाऊस; पूर्व उपनगरांना मुसळधार पावसाचा सर्वाधिक तडाखा

Date:

मुंबई | प्रतिनिधी

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रात शनिवार (४ जुलै) सकाळी ८.०० ते सायंकाळी ६.०० या दहा तासांच्या कालावधीत पूर्व उपनगरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. विक्रोळी पश्चिम येथील बिल्डिंग प्रपोजल कार्यालयात सर्वाधिक २४६.६ मिमी पाऊस नोंदविण्यात आला.

पूर्व उपनगरातील पवई महानगरपालिका शाळा (२४० मिमी), विक्रोळीतील टागोर नगर महानगरपालिका शाळा (२३१.८ मिमी), भांडुप कॉम्प्लेक्स (२२२.८ मिमी) आणि विक्रोळी अग्निशमन केंद्र (२२० मिमी) येथेही अतिमुसळधार पावसाची नोंद झाली.

पश्चिम उपनगरात चिंचोली अग्निशमन केंद्र (२२०.८ मिमी), पी/उत्तर विभाग कार्यालय (२१८.६ मिमी), अंधेरी अग्निशमन केंद्र (२०८.८ मिमी), जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महानगरपालिका शाळा (२०७.४ मिमी) आणि के-पश्चिम विभाग कार्यालय (२०६.२ मिमी) येथेही २०० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला.

मुंबई शहर भागात जी-दक्षिण विभाग कार्यालय (१२३.२ मिमी), एफ-उत्तर विभाग कार्यालय (१२०.४ मिमी), एफ-दक्षिण विभाग कार्यालय (११६.२ मिमी), मलबार हिल (११२.६ मिमी) आणि लोअर परळ येथील एन. एम. जोशी मार्ग महानगरपालिका शाळा (१११.२ मिमी) येथे लक्षणीय पर्जन्यवृष्टीची नोंद झाली.

सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भांडूपमध्ये रस्ता आणि फूटपाथ खचला, झाडेही उन्मळून पडली

मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या तुफान पावसामुळे ठिकठिकाणी दुर्घटना...

पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा; राजमाची परिसरात व इंगळून घाटात दरड कोसळली

राजमाचीकडे जाणारा रस्ता बंद; जेसीबीच्या सहाय्याने हटविण्याचे काम सुरू,...

विशेष मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी ‘साहस फाउंडेशन’चे परिश्रम

पुणे | प्रतिनिधी विशेष गरजा असलेल्या मुलांकडे समाजात अनेकदा दयेच्या...