भांडूपमध्ये रस्ता आणि फूटपाथ खचला, झाडेही उन्मळून पडली

Date:

मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या तुफान पावसामुळे ठिकठिकाणी दुर्घटना घडत आहेत. माटुंगा आणि दादरमध्ये झाडे पडल्याच्या घटना ताज्या असतानाच, आज (शनिवारी) दुपारी भांडूपमध्ये एक मोठी आणि धक्कादायक दुर्घटना घडली. भांडूप पश्चिमेकडील एलबीएस मार्गावर एशियन पेंट्सच्या समोर 100 बाय 100 फूट लांबीचा भलामोठा रस्ता आणि फूटपाथ अचानक खचला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र एका वाहनाचे नुकसान झाले आहे.

भांडूपमधील सोनापूर परिसरात एलबीएस मार्गालगत एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. यासाठी खूप खोलवर खड्डा खोदण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून आणि काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे, विकासकाने खोदलेल्या खड्ड्याशेजारील जमीन ओली होऊन ठिसूळ झाली. त्यामुळे शनिवारी दुपारी 1:25च्या सुमारास रस्त्याशेजारील फूटपाथ आणि रस्ता थेट खड्ड्यात कोसळला.
रस्ता खचतानाचा प्रसंग स्थानिकांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. रस्ता खचल्यामुळे तिथे असलेले एक मोठे झाड, बांधकाम साइटला लावलेले पत्रे आणि बस स्टॉपचा भागही थेट पाण्यात कोसळताना व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. तसेच रस्त्याखालील अंतर्गत वायरींगही उघडे पडून नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई पोलीस आणि महानगरपालिकेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संभाव्य धोका टाळण्यासाठी एलबीएस मार्गावरील या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. उर्वरित रस्ताही खचण्याची शक्यता असल्याने, पोलिसांनी या संपूर्ण परिसराला बॅरिकेडिंग करून नागरिकांना तिथे जाण्यास मज्जाव केला आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, विकासकाने सुरक्षिततेचे योग्य उपाय न योजता अतिशय खोल खड्डा खोदला होता. तसेच, गटार सफाईच्या कामातही कंत्राटदाराने हलगर्जीपणा केल्याने पाण्याचा निचरा योग्य प्रकारे झाला नाही, ज्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

सध्या मुंबईत जोरदार पाऊस सुरू असून पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे, सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पार्किंग बंद, बाहेर दुचाकींवर दंड; एरंडवण्यातील व्यावसायिक इमारतीवरून खर्डेकर आक्रमक

पार्किंग तातडीने खुले करण्याची महापालिकेकडे मागणी; तोपर्यंत ग्राहकांच्या दुचाकींवर...

नेपाळ आपत्ती : पुण्यातील आठ जण सुरक्षित

एक महिला मुंबईत सुखरूप पोहोचली; कैलास पर्वत परिसरातील सात...

राज्यस्तरीय बालविकास कार्यशाळेत पुण्याच्या ‘अर्बन95’ प्रवासाचे सादरीकरण

बालक-केंद्रित शहरी नियोजनावर पुणे महापालिकेचा भर; ‘पुणे किड्स फेस्टिव्हल’मध्ये...

देशभरात NEET-PG 2026 परीक्षा संपन्न; जयपूरमधील 2,445 उमेदवारांची 5 सप्टेंबरला पुनर्परीक्षा

2.73 लाख उमेदवारांसाठी 1,111 केंद्रांवर आयोजन; 2.65 लाखांहून अधिक...