इयत्ता चौथीच्या गणित पाठ्यपुस्तकातील मुद्रणदोष पुढील आवृत्तीत दुरुस्त होणार; क्यू आर कोड वर व्हिडीओ द्वारे सुधारित माहिती उपलब्ध करून देणार

Date:

पुणे, दि. ३० : इयत्ता चौथीच्या गणित विषयाच्या पाठ्यपुस्तकातील काही मुद्रणदोषांबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या अनुषंगाने संबंधित त्रुटींची दखल घेण्यात आली असून, त्या पुढील आवृत्तीत दुरुस्त करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच संबंधित बदलांचा व्हिडीओ तातडीने क्यू आर कोड द्वारे उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती पाठयपुस्तक मंडळ, पुणे कडून सांगण्यात आले आहे.

इयत्ता चौथीचे गणित पाठ्यपुस्तक एकूण १० माध्यमांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. त्यापैकी मराठी व इंग्रजी माध्यमातील काही मुद्रणदोष निदर्शनास आले आहेत.

मराठी व इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक १०९ वर भारतीय गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या निधनाची तारीख चुकीने २७ एप्रिल १९२० अशी छापली गेली आहे. त्याऐवजी २६ एप्रिल १९२० ही योग्य तारीख असून, हा मुद्रणदोष पुढील आवृत्तीत दुरुस्त करण्यात येणार आहे.

मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक ५५ वरील स्वाध्यायातील प्रश्न क्रमांक १ मधील ‘जोड्या लावा’ या भागात ‘१००० ग्रॅमपेक्षा जास्त’ असे छापले गेले आहे. त्याऐवजी ‘१००० किलोग्रॅमपेक्षा जास्त’ असे असणे अपेक्षित होते. ही त्रुटी केवळ मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात असून तीही पुढील आवृत्तीत दुरुस्त करण्यात येणार आहे.

इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक ७७ वर खालून चौथ्या ओळीत ‘of’ ऐवजी ‘of ₹1.’ तसेच खालून तिसऱ्या ओळीत ‘₹1.49 rupees’ ऐवजी ’49 rupees’ असे असणे अपेक्षित होते. ही चूकही केवळ इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात असून पुढील आवृत्तीत आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येणार आहे.

विद्यार्थी आणि शिक्षकांना योग्य माहिती त्वरित उपलब्ध व्हावी यासाठी संबंधित सुधारित बदलांचा व्हिडीओ पाठ्यपुस्तकातील QR Code द्वारे तातडीने अपलोड करण्यात येणार असल्याचे संबंधित विभागाने कळविले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

टीईटी पेपरफुटी प्रकरणी काँग्रेसचे सलग तिसऱ्या दिवशी आंदोलन.

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्यासाठी विधानसमोर युवक काँग्रेसचे आंदोलन. मुंबई,...

ट्रम्प म्हणाले- पेट्रोल कंपन्यांनी इंधन दर कमी करावेत:कच्चे तेल स्वस्त झाले, तरीही ग्राहकांकडून जास्त पैसे वसूल केले जात आहेत

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पेट्रोल कंपन्यांना इंधनाचे...

बंगालपासून काश्मीरपर्यंत 1500 किमी लांब मान्सून पट्टा तयार झाला-उत्तर भारतात 1 ते 4 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई- मान्सूनने मंगळवारी दुपारी जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल, उत्तराखंड...