जबरी चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद; १.३० लाखांचे चार मोबाईल जप्त

Date:

पुणे | प्रतिनिधी

कात्रज-कोंढवा रोडवरील माऊलीनगर बसथांब्याजवळ दूध आणण्यासाठी पायी जात असलेल्या नागरिकाला लोखंडी रॉडने मारहाण करून त्याचा मोबाईल हिसकावून नेणाऱ्या सराईत आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून चोरीतील १ लाख ३० हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

२४ मे २०२६ रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानासिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत राहुल सिताराम निकम (वय २८, रा. महंमदवाडी, कोंढवा) याला वंडरसिटी रोड परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीतील चार मोबाईल जप्त करण्यात आले.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सोहम शेंडकर यांच्यासह तपास पथकातील अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रस्ते वितळले, रुळ उखडले; युरोपमध्ये उष्णतेने मोडले सर्व विक्रम, आठवडाभरात 1300 हून अधिक मृत्यू

युरोप | युरोप सध्या विक्रमी उष्णतेच्या तडाख्यात सापडला असून स्वित्झर्लंड,...

आता जलवाहिनी दुरुस्ती: पर्वती परिसरासह दक्षिण पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद…

पुणे | प्रतिनिधी पर्वती HLR गोल टाकीपासून पद्मावती पंपिंग स्टेशनकडे...

वारकऱ्यांच्या ‘चरण सेवेला’ प्रारंभ

• मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची उपक्रम मुंबई,...