पुणे | प्रतिनिधी
पर्वती HLR गोल टाकीपासून पद्मावती पंपिंग स्टेशनकडे जाणाऱ्या १००० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीत गळती झाल्याने तिच्या दुरुस्तीचे काम गुरुवार, २ जुलै २०२६ रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई तसेच अपर इंदिरानगर पंपिंग स्टेशनमधून होणारा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, शुक्रवार, ३ जुलै २०२६ रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असून नागरिकांनी पाण्याचा आवश्यक साठा करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कामामुळे सहकारनगर, पद्मावती, पर्वती, बिबवेवाडी, तळजाई, अपर व लोअर इंदिरानगर, प्रेमनगर, आंबेडकर नगर, गुलाबनगर, राजीव गांधी नगर, काशिनाथ पाटील नगर, ओम अभिषेक, ओम अलंकार, विद्यासागर सोसायटी, नवमित्र सोसायटी, गंगाधाम, मार्केट यार्ड परिसरासह अनेक भागांतील पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे.

