रस्ते वितळले, रुळ उखडले; युरोपमध्ये उष्णतेने मोडले सर्व विक्रम, आठवडाभरात 1300 हून अधिक मृत्यू

Date:

युरोप |

युरोप सध्या विक्रमी उष्णतेच्या तडाख्यात सापडला असून स्वित्झर्लंड, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, पोलंड, डेन्मार्कसह अनेक देशांमध्ये तापमानाने सर्व विक्रम मोडले आहेत. गेल्या सात दिवसांत उष्णतेच्या लाटेमुळे १३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून रस्ते वितळणे, रेल्वेचे रुळ उखडणे, जंगलांना आग लागणे आणि जलाशयांमध्ये बुडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

फ्रान्समध्ये १९४७ नंतर प्रथमच तापमान ४४.३ अंश सेल्सिअसवर पोहोचले. पोलंडमध्ये १०५ वर्षांचा, तर ब्रिटन आणि डेन्मार्कमध्येही दशकांतील उष्णतेचे विक्रम मोडले गेले. जर्मनीत ४१.७ अंश तापमानाची नोंद झाली असून अनेक रेल्वे सेवा विस्कळीत झाल्या आहेत.

तज्ज्ञांच्या मते, युरोपची घरे आणि पायाभूत सुविधा थंड हवामान लक्षात घेऊन उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे तीव्र उष्णतेचा फटका अधिक बसत आहे. केवळ सुमारे २० टक्के घरांमध्ये वातानुकूलित यंत्रणा (एसी) असून, वृद्धांची संख्या जास्त असल्याने मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे.

हवामान तज्ज्ञांनी या परिस्थितीमागे ‘ओमेगा ब्लॉक’, ‘हीट डोम’ आणि वाढते ग्लोबल वॉर्मिंग ही तीन प्रमुख कारणे असल्याचे स्पष्ट केले आहे. आफ्रिकेकडून येणारे गरम, कोरडे वारे युरोपमध्ये अडकल्याने उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली आहे.

सध्या काही भागांना थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात आणखी एका ‘हीट डोम’चा धोका हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पश्चिम आणि मध्य युरोपमध्ये पुन्हा भीषण उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पार्किंग बंद, बाहेर दुचाकींवर दंड; एरंडवण्यातील व्यावसायिक इमारतीवरून खर्डेकर आक्रमक

पार्किंग तातडीने खुले करण्याची महापालिकेकडे मागणी; तोपर्यंत ग्राहकांच्या दुचाकींवर...

नेपाळ आपत्ती : पुण्यातील आठ जण सुरक्षित

एक महिला मुंबईत सुखरूप पोहोचली; कैलास पर्वत परिसरातील सात...

राज्यस्तरीय बालविकास कार्यशाळेत पुण्याच्या ‘अर्बन95’ प्रवासाचे सादरीकरण

बालक-केंद्रित शहरी नियोजनावर पुणे महापालिकेचा भर; ‘पुणे किड्स फेस्टिव्हल’मध्ये...

देशभरात NEET-PG 2026 परीक्षा संपन्न; जयपूरमधील 2,445 उमेदवारांची 5 सप्टेंबरला पुनर्परीक्षा

2.73 लाख उमेदवारांसाठी 1,111 केंद्रांवर आयोजन; 2.65 लाखांहून अधिक...