नसरापूर प्रकरण- नराधमाला ठोठावली मरेपर्यंत फाशीची शिक्षा,कोर्ट म्हणाले,'”फाशीची शिक्षाही अपुरी”

Date:

16 दिवसांत आरोपपत्र, 55 हून अधिक साक्षीदार; गुन्हा घडल्यापासून अवघ्या 60 दिवसांत फास्ट ट्रॅक कोर्टाचा ऐतिहासिक निकाल
पुणे : साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे याला पुण्यातील शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील अत्यंत संवेदनशील प्रकरणात विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयाने गुरुवारी भीमराव कांबळे याला भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यातील विविध कलमांखाली दोषी ठरवले होते. आरोपी सुधारण्याच्या पलिकडे आहे, असे नमूद करत न्यायमूर्तींनी हे दुर्मिळात दुर्मीळ प्रकरण असल्याचे सांगितले. आज, सोमवारी दिल्या जाणाऱ्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. निकाल ऐकण्यासाठी पीडित चिमुरडीचे आई-वडील, आजी आणि इतर नातेवाईकही उपस्थित होते.
“१६ दिवसात आरोपपत्र दाखल केले, हे सर्व प्रकरणात शक्य होईलच असे नाही. पीडित मुलगी अवघी तीन वर्षांची होती. हत्येनंतरही त्याने अत्याचार सुरु ठेवले. लैंगिक अत्याचार झाल्याचं शवविच्छेदन अहवालातही सिद्ध झालं आहे. आरोपीने चिमुरडी जिवंत राहील, याचा पर्यायच ठेवलेला नाही. त्याला आजन्म कारावासच काय, त्याला फाशीची शिक्षाही अपुरी पडेल. आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला आहे. कृत्य आरोपीनेच केले हे सिद्ध झाले आहे. आरोपी फाशीच्या शिक्षेस पात्र आहे. आरोपीने सुधारण्याची पातळी सोडली आहे. याआधी ५३ व्या वर्षी कुटुंबातील मुलीवर अत्याचार, तर वृद्ध महिलेवरही हल्ला. हे दुर्मिळात दुर्मीळ प्रकरण आहे.” असं न्यायमूर्तींनी नमूद केलं.

“मुलीच्या वेदना आणि कुटुंबीयांनी काय सहन केलं असेल, याची कोर्टाला जाणीव आहे. पोलिसांनी उत्कृष्ट तपास केल्याने ते अभिनंदनास पात्र आहेत. विशेष सरकारी वकिलांनी सचोटीने पाठपुरावा केला. डॉक्टर, सायबर एक्स्पर्ट आणि फॉरेन्सिक टीमनेही चांगलं काम केलं.” असं म्हणत न्यायालयाने सर्वांची पाठ थोपटली.

हत्येनंतरही आरोपीने लैंगिक अत्याचार सुरू ठेवले, आरोपीला फाशीची शिक्षाही अपुरीच – न्यायाधीश
पोलिसांनी उत्कृष्ट तपास केला, त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र- न्यायाधीश
विशेष सरकारी वकिलांनी सचोटीने पाठपुरावा केला – न्यायाधीश
न्यायाधीशांकडून शंकर खाडे केसचा दाखला देण्यात आला.
शिक्षेपासून वाचण्यासाठी आरोपीकडे कुठलाही पुरावा नाही- न्यायाधीश
अत्याचार करताना आरोपीने क्रूरतेचा कळस गाठला. पीडितेच्या शरीरावर 18 जखमा – न्यायाधीश
या घटनेला दुर्मिळातील दुर्मिळ घटना बोललं पाहिजे- न्यायाधीश
निर्घृण कृत्यांमध्ये मृत्युदंडाची तरतूद, आरोपीविरुद्ध सबळ पुरावे आहेत. – न्यायाधीश
कोर्टात निर्भया केसचाही दाखला देण्यात आला.
आरोपीला अपहरण, अत्याचार, हत्या, पोक्सो अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे.
कोर्टरूममध्ये दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद झाले.
काही राज्यांत घडलेल्या खटल्यांचा दाखला यावेळी देण्यात आला.
बशर अली केसमध्येही अशीच घटना घडल्याचे न्यायाधीशांनी म्हटले.
बच्चन सिंग विरुद्ध स्टेट ऑफ पंजाब या प्रकरणाचाही दाखला यावेळी देण्यात आला.
दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून निकालापर्यंत कोर्ट पोहोचत आहे. यावेळी घटना किती क्रूर आहे, यावरून काही मुद्दे विचारात घ्यावे लागतील, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवलं.

मृत्युदंडाची शिक्षा देतानाच्या बाबी न्यायाधीशांनी सांगितल्या.
यावेळी इतर राज्यांतील निकालही न्यायाधीशांनी वाचून दाखवले. दिलेल्या निकाल सर्व निकालांचं नसरापूरच्या घटनेशी साधर्म्य असल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं.
कोर्टात यावेळी मृत्युदंडाची शिक्षा असणाऱ्या 12 खटल्यांचा संदर्भ देण्यात आला.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांसह नागरिक आणि विविध सामाजिक संघटनाही न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयाने गुरुवारी कांबळेला भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यातील विविध कलमांखाली दोषी ठरवले. त्यानंतर शिक्षेच्या मुद्द्या वर सरकार पक्ष, बचाव पक्ष आणि मूळ फिर्यादी यांच्या वतीने स्वतंत्रपणे युक्तिवाद करण्यात आला.

….सरकारी वकील ॲड. अजय मिसर यांनी न्यायालयाकडे हा गुन्हा “दुर्मिळातील दुर्मिळ” (Rarest of Rare) स्वरूपाचा असल्याचा युक्तिवाद करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पीडित चिमुरडीच्या कुटुंबीयांनीही आरोपीला फाशीच व्हावी, अशी भूमिका घेतली आहे.

आरोपीने मांडला वयाचा मुद्दा; न्यायालयाने फेटाळला

सुनावणीदरम्यान आरोपीच्या बाजूने त्याच्या वाढत्या वयाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. वयाचा विचार करून फाशीऐवजी सौम्य शिक्षा द्यावी, अशी विनंती बचाव पक्षाने केली. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरला नसल्याची माहिती समोर आली आहे.

मेडिकल अहवालातील धक्कादायक निष्कर्ष

सरकारी पक्षाने न्यायालयासमोर सादर केलेल्या मेडिकल अहवालानुसार, आरोपीने चिमुरडीवर अत्यंत क्रूरपणे लैंगिक अत्याचार केले. एवढेच नव्हे तर, तिचा मृत्यू झाल्यानंतरही अत्याचार सुरूच ठेवल्याचा गंभीर दावा सरकारी पक्षाने केला. या अहवालातील निष्कर्षांमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती.

१ मे रोजी घडली होती घटना

१ मे रोजी नसरापूर येथे सुमारे ३९ मिनिटांच्या कालावधीत आरोपीने साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पुण्यासह राज्यभरात संताप व्यक्त झाला होता. विविध ठिकाणी आंदोलने झाली आणि आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.

फास्ट ट्रॅक न्यायालयात वेगवान सुनावणी

राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याचा निर्णय घेतला. पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या १६ दिवसांत आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर न्यायालयात वेगाने सुनावणी पार पडली. या खटल्यात ५५ हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजसह विविध तांत्रिक पुरावेही न्यायालयासमोर सादर करण्यात आले. आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. न्यायालय परिसरात नागरिकांचीही मोठी गर्दी झाली.

मागील सुनावणीत न्यायालयात काय घडले?

भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि खून खटल्यात पुणे जिल्हा सत्र न्यायालयात अत्यंत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी ६५ वर्षीय नराधम आरोपी भीमराव प्रभाकर कांबळेला दोषी ठरवले. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर न्यायाधीशांनी आरोपीला थेट पिंजऱ्यात उभे करून, “तू तो प्रसंग आठव आणि तूच सांग तुला कोणती शिक्षा द्यायला पाहिजे?” असा थेट सवाल केला. त्यावर या निर्लज्ज नराधमाने कोर्टातही स्वतःचा बचाव करत अपघाताचा खोटा बनाव रचण्याचा प्रयत्न केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रियकराच्या छळाने प्रेयसीची आत्महत्या-आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे | प्रतिनिधी आंबेगाव पठार परिसरात राहणाऱ्या एका तरुणीचा मानसिक...

डॉ. शमसुद्दिन तांबोळी यांचा सन्मान लोकशाही समाजवादाचा आवाज बुलंद करणारा : डॉ. श्रीपाल सबनीस

मनोहारी मैत्र संघातर्फे डॉ. शमसुद्दिन तांबोळी यांना भाई वैद्य स्मृती पुरस्कार...

कविता ही आयुष्यभर जपण्याचे व्रत : डॉ. स्वाती महाळंक

करम प्रतिष्ठान आयोजित करमरजनीगंधा उपक्रमास प्रतिसाद पुणे : कविता ही आयुष्यभर जपण्याचे...

“एका विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी देणे म्हणजे संपूर्ण समाजाच्या भविष्यामध्ये गुंतवणूक करणे होय.” – विकास पासलकर.

राजर्षी शाहू महाराज जन्मोत्सव सोहळा २०२६ उत्साहात संपन्न पुणे-समाजसेवकांचा गौरव,...