प्रियकराच्या छळाने प्रेयसीची आत्महत्या-आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Date:

पुणे | प्रतिनिधी

आंबेगाव पठार परिसरात राहणाऱ्या एका तरुणीचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या बहिणीला आरोपी साहिल आडसूळ (वय २८, रा. गजानन कॉलनी, साईसिद्धी चौकाजवळ, आंबेगाव पठार) याने २०२२ पासून प्रेमसंबंधाच्या बहाण्याने पुण्यात ठेवले. तिच्याकडील बचतीची रक्कम व सोन्याचे दागिने स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. तसेच वारंवार पैशांची मागणी करून पैसे न दिल्यास तिला मारहाण केली, मानसिक व शारीरिक छळ केला.

या सततच्या छळामुळे संबंधित तरुणीला राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

डेक्कनमध्ये घरफोडी; दोन लाखांचा ऐवज लंपास
डेक्कन परिसरातील एका निवासी इमारतीतील फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील सुमारे २ लाख १ हजार रुपयांच्या इलेक्ट्रिकल वायरचे बंडल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

🔹 खराडीत दहशत माजवणाऱ्या सात जणांविरुद्ध गुन्हा
खराडी परिसरात जुन्या वादातून काही युवकांनी लोखंडी हत्यारे व लाकडी दांडक्यांच्या साहाय्याने वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत निर्माण केली. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे.

🔹 शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची १.१० कोटींची फसवणूक
व्हॉट्सॲपवर शेअर ट्रेडिंगमध्ये मोठा परतावा मिळण्याचे आमिष दाखवून एका ७० वर्षीय नागरिकाकडून तब्बल १ कोटी १० लाख २१ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

🔹 बँक अधिकारी असल्याचे भासवून १०.३४ लाखांची ऑनलाईन फसवणूक
एरंडवणे येथील ७५ वर्षीय नागरिकाला बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून सीनिअर सिटिझन कार्डच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली. आरोपींनी विविध व्यवहारांद्वारे १० लाख ३४ हजार ५०० रुपये उकळल्याचे समोर आले आहे.

🔹 गुंतवणुकीच्या आमिषाने १५.५५ लाखांचा गंडा
बाणेर परिसरातील ७२ वर्षीय नागरिकाला व्हॉट्सॲपद्वारे शेअर ट्रेडिंग व आयपीओमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून १५ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

🔹 सिंहगड रस्त्यावर अपघात; एकाचा मृत्यू
सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी येथे झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. वाहन निष्काळजीपणे चालवल्याप्रकरणी संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

🔹 पाषाणमध्ये घरफोडी; दीड लाखांचे दागिने चोरीला
पाषाण परिसरातील एका घराचे दार उघडे असल्याची संधी साधून चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील सुमारे दीड लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व कागदपत्रे चोरीला गेल्याची नों

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. शमसुद्दिन तांबोळी यांचा सन्मान लोकशाही समाजवादाचा आवाज बुलंद करणारा : डॉ. श्रीपाल सबनीस

मनोहारी मैत्र संघातर्फे डॉ. शमसुद्दिन तांबोळी यांना भाई वैद्य स्मृती पुरस्कार...

कविता ही आयुष्यभर जपण्याचे व्रत : डॉ. स्वाती महाळंक

करम प्रतिष्ठान आयोजित करमरजनीगंधा उपक्रमास प्रतिसाद पुणे : कविता ही आयुष्यभर जपण्याचे...

“एका विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी देणे म्हणजे संपूर्ण समाजाच्या भविष्यामध्ये गुंतवणूक करणे होय.” – विकास पासलकर.

राजर्षी शाहू महाराज जन्मोत्सव सोहळा २०२६ उत्साहात संपन्न पुणे-समाजसेवकांचा गौरव,...