‘सूर्यकांत मांडरे : एक कलासक्त तेजस्वी कलाकार’

Date:

पुणे : किशोरवयात मी सूर्यकांत यांना प्रथम पाहिले, तेव्हा भारल्याप्रमाणे झाले होते. काही काळाने रूपेरी पडद्यावर मी त्यांची नायिका होईन, असे स्वप्नातही वाटले नव्हते. सूर्यकांत यांच्यासारख्या कलाकारासोबत मला काम करण्याची संधी मिळाली, हा मला भाग्ययोग वाटतो, असे उद्गार ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांनी मंगळवारी येथे काढले. सूर्यकांत अभिनेते म्हणून तर श्रेष्ठ होतेच, पण माणुसकीच्या नात्यानेही ते महान होते, असेही त्या म्हणाल्या.

पूना गेस्ट हाऊस आणि प्रकाश सूर्यकांत मांडरे व परिवार यांच्या वतीने मंगळवारी (दि. २) आयोजित सूर्यकांत मांडरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त ‘सूर्यकांत मांडरे : एक कलासक्त तेजस्वी कलाकार’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले होते. ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी होते. कवयित्री प्रतिभा शाहू मोडक, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, ज्येष्ठ नृत्यांगना लीला गांधी, ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, प्रकाश सूर्यकांत मांडरे, पूना गेस्ट हाऊसचे डॉ. किशोर सरपोतदार आदी मान्यवर व्यासपीठावर होते.

उपस्थित सर्वच कलाकारांनी सूर्यकांत यांच्या आठवणींचा पट यावेळी उलगडला. आशा काळे म्हणाल्या, मी सूर्यकांत यांना प्रथम पाहिले, तेव्हा ते उषा किरण यांच्यासह चित्रीकरण करत होते. मी त्यांच्याकडे भारल्यासारखी बघत होते. कालांतराने भालजी पेंढारकर यांच्या ‘तांबडी माती’ या चित्रपटात मी सूर्यकांत यांची नायिका झाले. नंतरही अनेक चित्रपटांत आम्ही भूमिका केल्या. ‘गनिमी कावा’ चित्रपटात एक प्रेमगीत चित्रित करण्यासाठी मला गजरा हवा होता, ती मागणी सूर्यकांत यांनी पूर्ण केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परिवेषात ते उभे राहिले, की साक्षात महाराजांची ऊर्जा पोचल्यासारखे वाटत असे, असेही त्या म्हणाल्या.

लीला गांधी म्हणाल्या, ‘प्रीतीसंगम’ या चित्रपटाच्या वेळी सूर्यकांत यांच्याशी पहिली भेट झाली. ते प्रसंग छान समजावून सांगत असत. प्रत्येकाला सांभाळून घेण्याची वृत्ती आणि खेळीमेळीचे वातावरण, हे त्यांचे वेगळेपण होते.

प्रतिभा शाहू मोडक म्हणाल्या, आम्ही १९९३ मध्ये पुण्यात आलो, तेव्हा सूर्यकांत आणि चारुकाका सरपोतदार ही दोनच माणसे परिचयाची होती. आम्ही नेहमी भेटत असू. शाहू मोडकांनंतर सूर्यकांत सातत्याने मला दिलासा देत असत.

रामदास फुटाणे यांनी सूर्यकांत आणि मी चित्रपट महामंडळाच्या निमित्ताने भेटलो आणि स्नेही झालो, अशी आठवण सांगितली. ते उत्तम चित्रकार होते. भालजी पेंढारकर आम्हा सर्वांचे गुरू आणि चारुकाका सरपोतदार हा आम्हाला जोडणारा दुवा होता, असेही ते म्हणाले.

उल्हास पवार यांनी सूर्यकांत यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख केला. कोल्हापूर तेव्हा कलाकारांचे आगार होते. पुण्यात असले, की सूर्यकांत स्कूटरवरून आमच्या घरी येत असत आणि मनमोकळ्या गप्पा रंगत असत, असे ते म्हणाले.

कलेप्रती, गुरुंप्रती सदैव ईमान हे सूर्यकांत यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते, असे गौरवोद्गार ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर यांनी काढले. देखणे व्यक्तिमत्त्व, उत्तम अभिनय, मैत्रीला जागणारा, सगळ्यांना सांभाळून घेणारा आणि चित्रपटसृष्टीच्या झगमगाटापासून दूर राहणारा कलाकार म्हणजे सूर्यकांत. त्यांच्या भूमिकांमधील वैविध्य उल्लेखनीय आहे. मदतीला धावून जाणारा, माणुसकीचे नाते जपणारा मोठा कलावंत, अशा शब्दांत त्यांनी सूर्यकांत यांचे वर्णन केले.

मांडरे यांच्या नातसून युगंधरा मांडरे आणि डॉ. किशोर सरपोतदार यांनी प्रास्ताविक केले. शिल्पकार सुरेश राऊत यांनी कार्यक्रम सुरू असताना सूर्यकांत यांचा अर्धपुतळा साकारला. सूर्यकांत यांच्या चित्रपट कारकिर्दीवर आधारित ध्वनीचित्रफित सुरवातीला दाखवण्यात आली. प्रकाश मांडरे यांनी आभार मानले. रवींद्र खरे यांनी सूत्रसंचालन केले. उत्तरार्धात सूर्यकांत यांच्या गाजलेल्या चित्रपटांतील लोकप्रिय गीतांचा कार्यक्रम पल्लवी आनदेव, प्रा. रवींद्र शाळू यांनी सादर केला. संहितालेखन सुलभा तेरणीकर यांचे होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनांची सीआयडी कडून तातडीने अंमलबजावणी; विषारी दारू प्रकरणाच्या तपासाला वेग

पुणे.दि.३: पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाची...

दहावी-बारावीनंतर करिअर निवडताना आत्मविश्वास, कौशल्यविकास आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक : आमदार डॉ. नीलम गोऱ्हे

धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी नियमित...

एकपात्री महोत्सवाला सुरुवात

पुणे : एकपात्री या कलाप्रकाराला आजच्या काळात भरपूर वाव...