आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचनांची सीआयडी कडून तातडीने अंमलबजावणी; विषारी दारू प्रकरणाच्या तपासाला वेग

Date:

पुणे.दि.३: पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाची शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सुरुवातीपासूनच गंभीर दखल घेतली असून, त्यांच्या सूचनांची गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) तातडीने अंमलबजावणी सुरू केल्याचे समोर आले आहे. डॉ. गोऱ्हे यांनी मंगळवार दि.२ जून रोजी सीआयडी पुणे कार्यालयाला भेट देऊन तपासाचा सविस्तर आढावा घेतला होता. या बैठकीत डॉ. गोऱ्हे यांनी तपास अधिक व्यापक करण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या होत्या.

सीआयडी पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, दापोडी व हडपसर येथे विषारी हातभट्टीची दारू पिल्याने झालेल्या मृत्यू प्रकरणातील दोन्ही गुन्ह्यांचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला असून तपासासाठी १० विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. दापोडी प्रकरणातील सहाही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची पोलीस कोठडी घेऊन पुढील चौकशी सुरू आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत आकाश जाधव, इरफान निसार कुरेशी आणि आर्यन संजय धोत्रे या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना सीआयडी च्या तपासातही अटक करून चौकशी केली जात आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाने ठाणे येथे दाखल केलेल्या संबंधित गुन्ह्यातील आरोपींना देखील सीआयडी तपासात समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तपासादरम्यान विविध घटनास्थळांवरील CCTV फुटेज, दारूचे नमुने आणि इतर पुरावे जप्त करून न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण सुरू असून मेथेनॉल पुरवठा साखळीतील दोन महत्त्वाचे संशयित निष्पन्न झाल्याची माहिती सीआयडीने दिली आहे. त्यांच्याकडून अधिक माहिती व पुरावे मिळविण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक शामराव काळे (8237229208)आणि सचिन चव्हाण (9011334580)यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून नागरिकांनी या गुन्ह्याबाबत कोणतीही माहिती असल्यास तपास अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

चौकट:
पुणे विषारी दारू प्रकरणात सीआयडी अधिकाऱ्यांनी अत्यंत तत्परतेने कारवाई करून माझ्या सूचनांची दखल घेत अंमलबजावणी सुरू केल्याबद्दल त्यांचे आभार मानते. या प्रकरणाचा तपास सर्व बाजूंनी आणि पारदर्शकपणे व्हावा, ही जनतेची अपेक्षा आहे. सामान्य नागरिकांच्या मनात सीआयडी विषयी कायमच विश्वास आणि आदर राहिला आहे. हा विश्वास अधिक दृढ करत दोषींवर कठोर कारवाई होईल, अशी मला खात्री आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स ठरलेला  ‘घबाडकुंड’ घेऊन येतोय थरार आणि रहस्याचा नवा अनुभव!

मराठी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांना सतत काहीतरी वेगळं आणि नावीन्यपूर्ण देण्याचा...

‘सूर्यकांत मांडरे : एक कलासक्त तेजस्वी कलाकार’

पुणे : किशोरवयात मी सूर्यकांत यांना प्रथम पाहिले, तेव्हा भारल्याप्रमाणे झाले होते....

दहावी-बारावीनंतर करिअर निवडताना आत्मविश्वास, कौशल्यविकास आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक : आमदार डॉ. नीलम गोऱ्हे

धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी नियमित...

एकपात्री महोत्सवाला सुरुवात

पुणे : एकपात्री या कलाप्रकाराला आजच्या काळात भरपूर वाव...