पुणे : पुण्यातील मार्केटयार्ड येथील हॉटेल रेवळ सिद्धी येथे आग लागल्याची घटना घडली. या आगीत २ कामगारांचा होरपळून जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.अग्निशामक विभागाचे नाईकनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड येथील गेट नंबर एक जवळ असलेल्या हॉटेल रेवळ सिद्धी येथे मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत हॉटेलच्या आतील बाजूस असलेल्या पोटमाळ्यावर तीन कामगार झोपले होते. त्यातील दोघांचा या आगीत जागीच मृत्यू झाला. तर एकावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहे. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. त्याचबरोबर या घटनेमधील मृतांची नावे समजू शकली नसल्याचे त्यांनी सांगितले.