आमदार हरवलेत,कोथरूडचे ‘पुणेरी’ बॅनर ने राजकीय खसखस

Date:

पुणे: कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने कोथरूड परिसरात बॅनर लागले आहेत.कोथरूडचे आमदार महिनाभरापासून हरविल्याने त्यांच्या जिवलग सहकाऱ्यांना कुठे चैन लागेना,अर्थात त्यांचे हे जिवलग सहकारी,त्यांचे विरोधक आहेत कि पक्षातीलच स्पर्धक हे मात्र समजू शकलेले नाही.कोथरूड चे एक पैलवान,पक्षातीलच एक ताई यांच्या माथ्यावर कोल्हापुरी झटका बसल्याने आता या झटक्याला पुणेरी टोला लगाविण्यात आला आहे.

या बॅनरवर, ‘ पुणे शहरातील कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील हे गेल्या महिन्याभरापासून गेले आहेत. कुणाला सापडल्यास कृपया संपर्क साधावा’ अशा स्वरूपाचा आशय लिहला आहे. या बॅनरमुळे शहरात विविध चर्चांना उधान आले आहे.तर दुसऱ्या एका फ्लेक्सवर, दादा परत या असं लिहलं आहे. त्यानंतर त्यामध्ये, ‘दादा एक महिना झाला तुमचा शोध कुठेच लागत नाहीये. आम्ही तुम्हाला काहीही बोलणार नाही. तुम्ही जिथे कुठे असाल तिथून परत या. आम्ही तुमची वाट पाहतोय!’ असं लिहण्यात आले आहे. त्याखाली समस्त कोथरूडकरांची विनंती असल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे.कोथरूड विधानसभा मतदारसंघातील काही नागरिकांनी चंद्रकांत पाटील गेल्या अनेक दिवसांपासून मतदारसंघात फिरकले नाहीयेत, असा आरोप केला आहे. त्यामुळे कोथरूड परिसरात ‘दादा परत या’ अशा स्वरूपाचे फ्लेक्स लागल्याचे दिसत आहेत.कोथरूडचे आमदार असले तरी चंद्रकात पाटील हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते गेल्या महिनाभरापासून कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत विजयासाठी कोल्हापुरात ठाण मांडून बसले आहेत.यामुळे कोथरूडकरांना मात्र आपल्या आमदारांच्या भेटीला मुकावे लागते आहे.

यापूर्वीही पुण्यातील भाजप नेते धीरज घाटे यांच्या नावानेही बॅनर लागले होते. त्यामध्ये, ‘नको बापट, नको टिळक पुण्याला हवी आता नवी ओळख’असं लिहलेलं होतं. त्यामुळे पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात वेगवेगळे फ्लेक्स लागले होते. आता कोथरूडमधील चंद्रकांत पाटलांच्या नावाने लागलेल्या या बॅनरमुळे शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शंभरावे साहित्य संमेलन पुण्यातच

पुणे बाल पुस्तक जत्रेचे व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

साधू वासवानी पुलासाठी जलवाहिनी स्थलांतरात बदल; अतिरिक्त कामासाठी २ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पूल उभारणीच्या कामात...

घनकचरा व्यवस्थापनासाठी बीआरसी वाहन खरेदीचा ८.२१ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेकडून...