मनसे शहरप्रमुखपदावर आता साईनाथ बाबर: वसंत मोरेंना हटवले

Date:

पुणे-मशिदीवरील भोंगा प्रकरणी राज ठाकरे यांच्या निर्णयालाच किंवा वक्तव्याला एकप्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न केल्यावरून वसंत मोरे यांनी मनसे शहर प्रमुख पदावरून आज हटविण्यात आले तर त्या पदावर माजी नगरसेवक आणि मोरेंचे खास मित्र साईनाथ बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र मनसेच्या वतीने , मोरे यांच्याकडे केवळ ११ महिन्याकरिता अध्यक्षपद सोपविले होते त्याची मुदत संपल्याने नवी नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येते आहे. वसंत मोरे यांच्या कडे प्रदेश सरचिटणीस हे पद मात्र अजूनही कायम असल्याचे वृत्त आहे .

मशिदीवरील भोंग्यांविरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भूमिका घेतल्यानंतर मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी त्यास विरोध दर्शवत आपण असे कोणतेही कृत्य करणार नसल्याचे सांगितले त्यास ठराविक माध्यमांंतून प्रसिद्धी मिळाली याप्रकरणाची गंभीर दखल घेत मनसेचे अजय शिंदे यांनी ‘राजसाहेबांचा आदेश अंतिम ,वैयक्तिक भूमिकेला पक्षात स्थान नाही’असा इशारा देऊनही मोरे यांनी भूमिका बदलली नाही किंवा मवाळ धोरण स्वीकारले नाही परिणामी आज राज ठाकरे यांनी पुणे शहराध्यक्ष पदावरुन वसंत मोरे यांना हटवून त्यांच्या जागी माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.आज अगोदर मोरे मनसे पदाधिकारी ग्रुप मधून लेफ्ट झाले, त्यानंतर पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक आज राज ठाकरे यांच्या घरी शिवतीर्थावर पार पाडली. त्यावेळीच राज ठाकरे यांच्या हस्ते साईनाथ बाबर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. भोंगा प्रकरणी राज यांच्या निर्णयालाच आव्हान दिल्याने मोरे यांना समजवण्यासाठी शिवतीर्थावर राज यांनी भेटीला बोलाविले असे वृत्त हि काही माध्यमांनी दिले होते ते निराधार ठरले .

नगरसेवक वसंत मोरे हे मनसेचे पुण्याच्या दक्षिण भागातील एक प्रमुख नेते असून राज ठाकरे यांचे जवळचे कार्यकर्ते मानले जात होते . साधारण 3 वर्षापासून सोशल मीडियातून मोरे यांनी प्रचंड लोकप्रियता मिळविली,पण विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला ,महापालिकेच्या राजकारणातसुद्धा आक्रमक आणि आपले वर्चस्व निर्माण केलेल्या वसंत मोरे यांचा प्रभाव प्रचंड होता , पण सूत्रांचे म्हणणे असे आहे कि,’ मनसे म्हणूनच उदय झालेले मोरे सुरुवात विसरल्याचे गेल्या ३ वर्षात बोलले जाऊ लागले होते.त्यातच त्यांनी पक्षनेतृत्वाच्या आदेशालाच जणू आव्हान दिल्याचे ‘भोंगा ‘ प्रकरणाने चित्र निर्माण झाले.भोंगा प्रकरणात त्यांनी घेतलेली भूमिका ,माध्यमात येऊ लागलेल्या बातम्या या साऱ्यांचा परिणाम झाला . पुण्यात मोरे आणि साईनाथ बाबर हे दोनच नगरसेवक उरले होते . नुकतेच मनसेच्या कसब्यातील नेत्या, माजी नगरसेविका रुपाली ठोंबरे पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला होता.

मनसे सोडण्याबाबत विचार नाही, मात्र भोंग्याला विरोधच- वसंत मोरे
काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ,’पदावरून हटवल्यानंतर वसंत मोरे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना वसंत मोरे यांनीच पूर्णविराम दिला आहे. मी पक्षाशी एकनिष्ठ राहिल. पक्ष सोडण्याबाबत माझा कोणताही विचार नाही, असे वसंत मोरे यांनी म्हटले आहे. तसेच, मनसेच्या काही नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेण्यासंदर्भात मला सूचना केली होती. मात्र अद्याप भेट झाली नाही, असेही त्यांनी सांगितले. तसेच पक्षाने कारवाई केल्यानंतर तरी भोंग्याबाबतची आपली भूमिका बदलणार का, असे विचारले असता मी भूमिका बदलू शकत नाही. आपल्या भोंग्याच्या राजकारणाला विरोध कायम असल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शिवसेना उबाठा पक्ष: पुण्यातील शहर नेतृत्वात फेरबदल होण्याचे संकेत

“संघटना हीच शिवसेनेची ताकद; पुण्यात ‘मिसिंग लिंक’ जोडण्याचे...

विद्यापीठ चौकातील पाणी गळती रोखण्याचे आदेश; बाणेर, हिंजवडीतील अडथळे दूर होणार!

मेट्रो-३ च्या कामासाठी 'पीएमआरडीए' 'ॲक्शन मोड'मध्ये; अतिरिक्त आयुक्तांकडून 'ग्राउंड...

‘फुलचंद पाना’तून नशेच्या गोळ्या

पुणे-पुणे पोलिसांनी 'फुलचंद पानात' नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर...

नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार

नव्या ६० केंद्रांना मंजुरी,ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२००...