फोरसाइट महाविद्यालयाचा पदवी प्रदान सोहळा संपन्न

Date:

पुणे-यशस्वी कारकीर्द आणि एकूणच जीवनात सफल होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ज्ञान कौशल्य याबरोबर भावनिक आणि मानसिक प्रशिक्षनाची आवश्यकता असल्याचे मत आनंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयकांत कोठारी यांनी व्यक्त केले .

फोरसाइट महाविद्यालयातील बी कॉम बी बी ए आणि बी बी ए ( सी ए) च्या विद्यार्थ्यांना विजयकांत कोठारी यांच्याहस्ते पदवी प्रदान करण्यात आली . यावेळी फोरसाइटचे संचालक शैलेश मेहता नगरसेवक विशाल धनवडे , , प्रा. मन्सूर खान प्रा. रवी पिल्ले निशा मेहता ,प्रा. शिल्पा खाडे आदी मान्यवर उपस्थित होते .

घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले महर्षी कर्वे यांच्या सारख्या महान व्यक्ती महात्म्यांनी शिक्षणाचे महत्व ओळखले होते . अनेक समस्यांना तोंड स्वतः शिक्षण घेतले . समाजात शिक्षणाचा प्रसार करून देश घडविण्यात मोठा वाटा उचलला ,अशा आदर्शांचा करणे आवश्यक आहे असे विजयकांत कोठारी यांनी व्यक्त केले .

सध्याच्या काळात केवळ औपचारिक शिक्षण घेणे पुरेसे नाही . आधुनिक तंत्रज्ञान कौशल्य आणि सवांद कला आत्मसात करणे आवश्यक आहे . असे नगरसेवक विशाल धनवडे यांनी नमूद केले आहे .

महाविद्यालयामध्ये शिक्षणाबरोबर विदयार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वागीण विकास साधणे यावर भर दिला जातो फोरसाइटच्या संस्थेच्यावतीने आठवी ते दहावी शैक्षणिक  वर्ग सुरु करणार आहोत . असे फोरसाइटचे संचालक शैलेश मेहता यांनी सांगितले .

यशाच्या राज्यमार्गावर चालत असताना आपल्यासाठी झटणाऱ्या आई – वडील शिक्षक यांना कधी विसरू नका असे मत प्रा. रवी पिल्ले यांनी व्यक्त केले .

कार्य्रक्रमाचे प्रास्ताविक निशा मेहता यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. शिल्पा खाडे यांनी केले . तर आभार प्रा. अर्चना म्हस्के यांनी मानले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज ठाकरेंच्या ‘अदानी’ विरोधाने धारावीत 7 पैकी 6 जागांवर महायुतीचा पराभव

मुंबई :महापालिकेच्या निवडणुकीत भाजप - शिंदे गटाचा विजय झाला....

एमआयटी एडीटी विद्यापीठाची श्री बालाजी विद्यापीठावर मात 

विश्वनाथ स्पोर्टस् मीटः निकमारकडून एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाचा १०२ धावांनी...