महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवणार-श्रीनाथ भिमाले

Date:

पुणे, ता. २९ : पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. शाळांमध्ये अतिरिक्त कॅमेरे बसविण्यासह त्यासाठी आवश्यक विद्युत व नेटवर्क यंत्रणा उभारण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे एक कोटी ९९ लाख ५५ हजार रुपये खर्च अपेक्षित असून, आयसीक्यूआर आयटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निविदा स्वीकारण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली. या कामासाठी आठ महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली आहे. ही माहिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षितता अधिक मजबूत करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणेचा विस्तार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी विद्युत विभागाने पूर्वगणनपत्रक तयार करून निविदा प्रक्रिया राबविली. या प्रक्रियेत चार निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी तीन निविदाधारक पात्र ठरले, तर एक निविदा अपात्र ठरली.

पात्र निविदाधारकांमध्ये आयसिक्युअर आयटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अंदाजपत्रकीय दरापेक्षा ०.२२ टक्के कमी दराने निविदा सादर केली. तर जे. डी. एंटरप्रायझेस आणि निखिल नेटवर्क्स यांनी अंदाजपत्रकीय दराने निविदा सादर केल्या. त्यामुळे सर्वांत कमी दराची निविदा सादर करणाऱ्या आयसिक्युअर आयटी कंपनीची निविदा स्वीकारण्याची शिफारस विद्युत विभागाने केली आहे.

या कामासाठी जीएसटीसह एक कोटी ९९ लाख ५५ हजार ६३७ रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर यंत्रणा, कॉपर वायरिंग, नेटवर्क केबल, HDMI केबल, नेटवर्क स्विच, नेटवर्किंग साहित्य, विद्युत जोडणी आणि इतर आवश्यक उपकरणांचा समावेश आहे. त्यामुळे शाळांमधील विद्यमान सीसीटीव्ही यंत्रणेचा विस्तार होणार आहे.

संबंधित कंपनीने कामगिरी हमीपोटी आवश्यक बँक गॅरंटी सादर केली आहे. मान्य तांत्रिक निकषांनुसार काम करून घेण्याची जबाबदारी विद्युत विभागावर राहणार आहे. या कामासाठी महापालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूद उपलब्ध असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वीजवाहिन्या भूमिगत करणार

पुणे, ता. २९ : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील अभय अरण्य सोसायटी...

दिवाळीतील गुरुवारची पाणी कपात रद्द

सणासुदीत पुणेकरांना दिलासा स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती पुणे,...

‘दुष्काळात साहित्य संमेलन कशासाठी? संमेलन रद्द करा, १८ कोटी दुष्काळग्रस्तांना द्या!’ — सुनील माने

शंभराव्या मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा...