पुणे- पुण्यात मराठी चित्रपट महामंडळाला कार्यालयासाठी तसेच स्व. गायक जगदीश खेबुडकर आणि स्व. अभिनेते सुर्यकांत मांढरे यांच्या स्मरणार्थ दालन उभारण्यासाठी माझ्या महापौर पदाच्या कारकिर्दीत 5 ते 6 हजार चौरस फुट जागा मिळवून देईल असे स्पष्ट आश्वासन आज महापौर प्रशांत जगताप यांनी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि अभिनेते ,ख्यातनाम सूत्रसंचालक योगेश सुपेकर यांना दिले . यावेळी महामंडळाने तळजाई येथे आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाचे निमंत्रण महापौरांना देण्यात आले. येत्या २ जून रोजी हा कार्यक्रम महामंडळ आणि महापालिका यांच्या वतीने आयोजित करण्यात आल्याचे मेघराज राजेभोसले यांनी सांगितले .