Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विचारमंथन बैठक संपन्न

Date:

पुणे-मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त येत्या 17 सप्टेंबर रोजी पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील 10 मराठवाडा संघटनांतर्फे संयुक्तपणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठीची विचारमंथन व नियोजन बैठक नुकतीच रहाटणीतील बळीराज मंगल कार्यालय येथे संपन्न झाली. या बैठकीला कला-क्रीडा, साहित्यिक, उद्योजक, व्यापारी , ज्येष्ठ नागरीक, राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले मराठवाडयातील 470 बांधव उपस्थित होते.
शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून नियोजन समितीची बैठक सुरु करण्यात आली.  यामध्ये मराठवाडयातील बांधवांचे आर्थिक, सामाजिक प्रश्न कोणत्या मार्गाने सोडवता येतील, यावर विचारमंथन करण्यात आले. तसेच कार्यक्रम कोणत्या स्वरूपात करावा कसा करावा याविषयी चर्चा झाली. मराठवाडयातील 10 संघटना मिळून 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम एकसंघ समितीद्वारे मराठवाडा मुक्तिदिन साजरा करणार आहेत. तसेच अनेक बांधवांच्या सूचनाही यावेळी घेण्यात आल्या. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानंतर मराठवाडा भवन तयार होईपर्यंत प्रत्येक बांधवाने आठवड्यातून किमान एक तास आपल्या भवनासाठी देणार असल्याची शपथही यावेळी घेण्यात आली.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विमान अपघात:उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्राकडे केला तातडीने संपर्क

मुंबई, १२ जून २०२५ : अहमदाबाद विमानतळावर आज सकाळी...

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर...

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिराच्या १२८ व्या वर्धापन दिनाच्या निमित्त मोफत आरोग्य शिबीर 

आरोग्य शिबीरात २४५ जणांची तपासणी पुणे : रक्तदाब, वजन, रक्तातील...