Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आश्चर्यम …. महेश वाबळे देखील भाजपमध्ये …

Date:


पुणे- नाना वाबळे यांचे चिरंजीव महेश वाबळे देखील आज आपल्या पत्नीसह  भाजपा पक्षात दाखल झाले . आज पुण्यातील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची भेट घेवून त्यांनी हा पक्षप्रवेश केला . यावेळी त्यांनी जोरदार बाईक रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले .
महेश वाबळे यांच्या पत्नी मनीषा या प्रभाग क्रमांक ३५ मधून इच्छुक आहेत . अगदी काल पर्यंत महेश वाबळे हे कॉंग्रेसच्या कार्यक्रमात आणि आंदोलनात सहभागी होताना दिसत होते ,गुडलक चौकात नरेंद्र मोदी यांच्या विरोधात तसेच मंडई येथून मोदी यांच्या विरोधात कॉंग्रेसने केलेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते . पुण्यातील संविधान मोर्चात देखील ते कॉंग्रेस चे आ. शरद रणपिसे यांच्या समवेत सहभागी झाले होते.कॉंग्रेसचे युवा नेते विश्वजित कदम यांच्या ही वाबळे हे कायम संपर्कात असत ,कायम कॉंग्रेसच्या कार्यक्रमात दिसणारा हा तरुण कार्यकर्ता … भाजपमध्ये गेल्याने प्रभाग क्रमांक ३५ मधील समीकरणे बदलतील काय ? ते मात्र येणारा काळ च सांगेल .भाजप प्रवेशाबाबत वाबळे यांच्या समवेत बाबा मिसाळ अग्रभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे . या पुढे वाबळे  किंवा त्यांच्या पत्नीला भाजप मध्ये कोणते स्थान मिळेल , त्यांचा सन्मान कसा राखला जाईल हे देखील पाहणे अर्थातच महत्वाचे  ठरणार आहे .

दरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजी, नगरसेवक प्रभाकर कदम, मनसेचे राजाभाऊ कदम, स्वप्नाली कदम, शिवसेनेचे संजय घुले, काँग्रेसचे नगरसेवक अभिजित कदम, नरेंद्र सोलंकी यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना, मनसे या सर्व पक्षतील आजी माजी नगरसेवक, शाखाप्रमुख आणि अनेक कार्यकर्त्यांनी मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.हडपसर मतदार संघातील प्रभाग क्रमांक 41 येथील आमदार योगेश टिळेकर यांच्या मतदार संघातील विविध विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. कोंढवा बु.|| येथील शत्रूंजय मंदिराजवळ हा कार्यक्रम पार पडला. यावेळी हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष योगेश गोगावले, खासदार संजय काकडे, खासदार अनिल शिरोळे आदी उपस्थित होते. तसेच अग्निशामक केंद्र, सार्वजनिक दवाखाना, आणि एका उर्दू शाळेचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, माजी नगरसेविका रंजनाताई टिळेकर आदी उपस्थित होते

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर...

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिराच्या १२८ व्या वर्धापन दिनाच्या निमित्त मोफत आरोग्य शिबीर 

आरोग्य शिबीरात २४५ जणांची तपासणी पुणे : रक्तदाब, वजन, रक्तातील...

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे २४२ प्रवासी असलेले विमान कोसळले

https://youtube.com/shorts/zq2TKqem9-Q गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांच्यासह 242 प्रवासी होते...

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून ना. पाटील यांचे अभिष्टचिंतन ना. चंद्रकांतदादा पाटील...