” महावीर जयंती ” निमित्त वॉटर कुलर पाणपोई चे उदघाटन
पुणे- अरिहंत सोसायटी तर्फे छत्रपती शिवाजी रोड येथील मार्केट यार्ड परिसरातील अरिहंत सहकारी गृहरचना संस्था मर्यादित येथे ” महावीर जयंती ” निमित्त ३०० लिटर ची अद्यावत वॉटर कुलर पाणपोई चे उदघाटन महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भीमाले , नगरसेवक प्रवीण चोरबोले, डॉ. भारत वैरागे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एकनाथराव खैरे व पी. आय होंनराव यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अरिहंत सोसायटी चेअरमन बचूभाई राठोड, सेक्रेटरी अशोक संचेती, खजिनदार दीपक ओसवाल, व असंख्य जैन बांधव उपस्थित होते. ही पाणपोई बाराही महिने चालू राहील. या पाणपोई साठी नगरसेवक प्रवीण चोरबोले यांनी विशेष व तातडीचे प्रयत्न केले. पाणी वाचवा हा भगवान महावीरांच्या या संदेशा नुसार उपस्थित असलेल्या सर्वांनी पाण्याच्या बचतीची शपथ घेतली .