Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सिंहाच्या जोडीचे आजपासून पुण्यात दर्शन..सुट्टीची पर्वणी

Date:

पुणे-महिन्याच्या  प्रतीक्षेनंतर पुणेकरांना जंगलाच्या राजा आणि राणीचे राजीव गांधी प्राणी संगहालयात   दर्शन झाले. गुजरातमधील सक्करबाग प्राणीसंग्रहालयाच्या वतीने ही सिंहाच्या नर-मादीची जोडी देण्यात आली आहे. कात्रज उद्यानातील या सिंहाचे नाव तेजस, तर मादीचे नाव सूब्बी असे ठेवण्यात आले आहे. आज जेव्हा तेजस व सुब्बी ही सिंहाची जोडी पिंजऱ्यातून बाहेर आली. तेव्हा त्या जोडीला पाहणा-यांची अक्षरशः झुंबड उडाली काहींनी टाळ्या वाजवून तर काहींनी शिट्ट्यामारून या जोडीचे  स्वागत केले.

 

पहिल्या दिवशी सिंहाला पाहायला झालेली गर्दी
सिंहाला पाहायला आणि त्याची छायाचित्रे टिपायला.. वार्तांकन करायला आलेला पत्रकारांचा समुह
सावलीत विसावण्याचा एक प्रयत्न
नव्या प्रदेशात नव्या चेहऱ्यांना सामोरे गेलेली ही जोडी

या रुबाबदार  जोडीचे फोटो काढण्यासाठी उपस्थितांचे कॅमेरे सरसावले. चार फूट उंच आणि दणकट यष्टी आणि मानेवरी आयाळ यामुळे तेजस राजासारखा दिसत होता. या उपक्रमाचा शुभारंभ महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव, विद्यार्थी, पर्यटक उपस्थित होते. या जोडीला 21 डिसेंबर 2016 रोजी गुजरात येथील जुनागडच्या शक्करबाग प्राणीसंग्रहालयातून आणण्यात आले आहे. तेजस आणि सुब्बी या सिंहाच्या जोडीला आज नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले. या जोडीचा जन्म 2010 मध्ये झाला आहे. गेल्या 7 वर्षात हे दोघेही गुजरातमधील  प्राणीसंग्रहालयाच्या आवारात रमले आहेत. त्यामुळे पुण्यातील प्राणी संग्राहलयात देखील चांगले रमले आहेत. यांचा महिन्याचा खाण्याचा खर्च 25 ते 30 हजार रुपये आहे. रोज 8 किलो मांस या जोडीला देण्यात येत आहे.कात्रजच्या उद्यानात सध्या चारशेच्यावर प्राणी आहेत. त्यात आता सिहांचीही भर पडली आहे. विशेष म्हणजे राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातील पाच विदेशी प्रजातीचे पक्षी सक्करबाग प्राणीसंग्रहालयास देण्यात आले आहेत. त्याबदल्यात ही नर मादी जोडी सक्करबाग प्राणीसंग्रहालयाने कात्रजच्या प्राणीसंग्रहालयास दिली आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विमान अपघात:उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्राकडे केला तातडीने संपर्क

मुंबई, १२ जून २०२५ : अहमदाबाद विमानतळावर आज सकाळी...

 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचे वेळापत्रक जाहीर...

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिराच्या १२८ व्या वर्धापन दिनाच्या निमित्त मोफत आरोग्य शिबीर 

आरोग्य शिबीरात २४५ जणांची तपासणी पुणे : रक्तदाब, वजन, रक्तातील...