Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महिन्यातून एकदा पीएमपीतून मोफत प्रवासाला ‘मुहूर्त’ कधी ? ..आबा बागुल

Date:

पुणे

शहराची सार्वजनिक वाहतूक  सेवा असलेल्या पीएमपीकडे नागरिक आकर्षित व्हावे आणि खासगी वाहने न वापरता सार्वजनिक वाहतूक सेवेचा अधिकाधिक वापर वाढावा यासाठी पुणे महानगरपालिकेने महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पीएमपीतून मोफत प्रवासासाठी चार महिन्यापूर्वी मान्य केलेल्या ठरावाची अंमलबजावणी पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे  हे तत्परतेने करणार का ? असा सवाल माजी उपमहापौर आबा बागुल यांनी उपस्थित केला आहे.

पीएमपीएमएलच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकाची सूत्रे हाती घेताच  तुकाराम मुंढे यांनी ‘लेटलतीफ’ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पीएमपीला शिस्त लावण्याचा धडाका त्यांनी सुरु केला असून पीएमपीच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी त्यांनी कडक पाऊल उचलले आहेत . या पार्श्वभूमीवर  शहराची सार्वजनिक वाहतूक  सेवा असलेल्या पीएमपीकडे नागरिक आकर्षित कसे होतील आणि खासगी वाहनांचा वापर टाळून पीएमपीचा वापर वाढावा यासाठी चार महिन्यांपूर्वी पालिकेच्या मुख्यसभेने मंजूर केलेल्या  महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पीएमपीतून मोफत प्रवासाचीच पुणेकरांना अजूनही प्रतिक्षाच करावी लागत असल्याचे चित्र आहे त्यामुळे पीएमपीचे सूत्रे हाती घेणारे तुकाराम मुंढे आता पुणेकरांना दिलासा देतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे पीएमपीला तोट्यातून वाचविण्यासाठी तसेच  या योजनेचा आर्थिक भार पडू नये यासाठी सुमारे  पावणे दोन कोटी रुपयेही महापालिका  पीएमपीएमएल​ला ​ अदा करणार आहे.

सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर अधिकाधिक  वाढावा त्याचबरोबर  एक दिवस तरी प्रदूषण टळावे ​आणि इंधन बचतीलाही चालना मिळावी या उद्देशाने तत्कालीन उपमहापौर आबा बागुल यांनी महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पीएमपीतून पुणेकरांना मोफत प्रवासाबाबत ठराव दिला होता. स्थायी समितीसह मुख्यसभेनेही एकमताने  संमत करून तो पीएमपीएमएलकडे पाठविला होता मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही.

यासंदर्भात माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, पीएमपीचे सक्षमीकरण झालेच पाहिजे ;पण शहराच्या सार्वजनिक सेवेची लाईफलाईन असणाऱ्या पीएमपीकडे पुणेकर आकर्षित होणेही गरजेचे आहे तसेच  नागरिकांना त्यांच्या खासगी वाहनाचा वापर टाळून पीएमपी बससेवेचा वापर करण्याची सवय  लागावी आणि पीएमपीची तूटही कमी होईल या हेतूने महिन्यातून शेवटच्या सोमवारी पीएमपीतून पुणेकरांसाठी  मोफत बसप्रवासाचा ठराव दिला मात्र आता महापालिका निवडणूक संपूनही या मान्य  ठरावाची  पीएमपीएमएल प्रशासनाकडून अजूनही  अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे पीएमपीएमएलच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी तत्परतेने या ठरावाची अमलबजावणी करणे आवश्यक आहे. असे आबा बागुल म्हणाले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...

ट्रम्प म्हणाले- भारत-पाककडे खूप अण्वस्त्रे, आम्ही अण्वस्त्र युध्द थांबवले

इस्लामाबाद -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही दोन...

उद्या दहावी बोर्डाचा निकाल:अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता पाहता येणार

यंदा परीक्षेला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले ...पुणे-महाराष्ट्र राज्य...

“रेड 2 ने १०० कोटींचा टप्पा पार केला, याबद्दल मी मनापासून आभारी आहे!” – वाणी कपूर

ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘रेड’ चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘रेड 2’ ने...