· 60 पेक्षा जास्त फायदे देणारे पाच नवीन राइडर्स सादर
· मेंटल वेलबीइंग, एम्पॉवरहर, ओपीडी केअर, कॅनकेअर आणि फ्लेक्सी शिल्ड हे नवीन राइडर्स महत्त्वाच्या आरोग्य गरजांच्या पूर्ततेसाठी तयार करण्यात आले आहेत.
मुंबई, २३ ऑक्टोबर २०२४: भारतातील आघाडीची जनरल विमा पुरवठादार कंपनी TATA AIG जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने आज 60 पेक्षा जास्त फायदे देणारे पाच नवीन राइडर्स सादर करण्याची घोषणा केली. त्यायोगे त्यांच्या रिटेल आरोग्य विमा उत्पादनांची लवचिकता आणि व्यापकता वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. वैद्यकीय खर्च सतत वाढत असल्याने आणि आरोग्यसेवेच्या गरजा बदलत असल्याने वाढत्या आरोग्य समस्या आणि जीवनशैली बदलांचा विचार करून हे राइडर्स वैयक्तिकृत संरक्षण देण्यासाठी तयार केले गेले आहेत. या सादरीकरणातून ग्राहकांना आरोग्य विमा क्षेत्रात विकास साधणाऱ्या संबंधित आणि अभिनव उपायसुविधा देण्याची TATA AIG ची बांधिलकी प्रतिबिंबीत होते.
मेंटल वेलबीइंग, एम्पॉवरहर, ओपीडी केअर, कॅनकेअर आणि फ्लेक्सी शिल्ड हे नवीन राइडर्स मानसिक आरोग्य, महिलांचे आरोग्य आणि कर्करोग संरक्षण या सारख्या महत्त्वाच्या आरोग्य गरजांच्या पूर्ततेसाठी तयार करण्यात आले आहेत. एम्पॉवरहर राइडर महिलांच्या समग्र आरोग्य समस्यांवर लक्ष केंद्रित करते. जसे की वंध्यत्व, PCOS आणि इतर स्त्रीरोग संबंधित समस्या. मेंटल वेलबीइंग राइडर या उद्योगक्षेत्रात प्रथमच मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी प्रतिबंधात्मक तपासण्या आणि पुनर्वसन संरक्षण सादर करते. कॅनकेअर कर्करोगासाठी वाढीव संरक्षण देते, ओपीडी केअर आणि फ्लेक्सी शिल्ड ग्राहकांना वाढत्या वैद्यकीय खर्च आणि दैनंदिन आरोग्य खर्चांपासून सुरक्षित करतात.
क्लेम प्रक्रिया सुधारणा:
TATA AIG ने त्यांच्या क्लेम सेटलमेंट प्रक्रियेमध्ये देखील महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. ग्राहकांचा विश्वास टिकवण्यासाठी हे महत्त्वपूर्ण आहे. कंपनीचे कॅशलेस क्लेम्सचे उपयोग आर्थिक वर्ष 2022-23 मधील 67.7% वरून आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 76.95% वर गेले आहेत. त्यामध्ये 96% कॅशलेस क्लेम्सवर चार तासांच्या आत प्रक्रिया केली जाते आणि 85% रिइम्बर्समेंट क्लेम्स पाच दिवसांच्या आत सेटल केले जातात.
कंपनी येत्या वर्षांत 100% कॅशलेस क्लेम्सच्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करत आहे. या सुधारणांमुळे उद्योगक्षेत्रात कार्यक्षमतेसाठी आणि ग्राहक समाधानासाठी नवीन मापदंड प्रस्थापित करत TATA AIG च्या जलद, सहज सेवेच्या बांधिलकीचे दर्शन होते.
नेटवर्क विस्तार
TATA AIG ने देशभरात गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळण्यासाठी आपले नेटवर्क आक्रमकपणे विस्तारित केले आहे. भारतातील 11,700 हून अधिक नेटवर्क हॉस्पिटल्ससह गेल्या 18 महिन्यांत 64% वाढ दर्शवत, TATA AIG चे प्रमुख लक्ष विशेषकरून वंचित क्षेत्रांमध्ये त्यांचे स्थान विस्तारण्यावर आहे. OPD नेटवर्कमध्ये 5,000 हून अधिक सूचीबद्ध डॉक्टर आणि 3,000 हून अधिक निदान पुरवठादार आहेत. ते व्यापक आरोग्य सेवा संरक्षण सुनिश्चित करतात. याशिवाय ग्राहकांच्या सोयीसाठी आणखी सुधारणा करत 10 पेक्षा जास्त भाषांमध्ये समर्थित मजबूत टेलीकन्सल्टेशन सेवा आहे.
TATA AIG जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष आणि एजन्सी प्रमुख प्रतीक गुप्ता यांनी नाविन्यपूर्णता आणि विकास यावर असलेल्या कंपनीच्या बांधिलकीवर जोर दिला: “या नवीन राइडर्सचे सादरीकरण हा आरोग्य विमा क्षेत्रातील वाढीस गती देण्याच्या आमच्या धोरणातील महत्त्वाचा टप्पा आहे. जेथे आरोग्यसेवा सुविधा उपलब्धता आणि जागरूकता वेगाने वाढत आहे अशा भारतातील विशेषतः टियर 2 आणि 3 शहरांमधील विस्तारावर आमचे लक्ष केंद्रित आहे. शाखा, एजंट्स आणि हॉस्पिटल पार्टनर्सचे नेटवर्क वाढवून, आम्ही लाखो लोकांसाठी गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा अधिक प्रवेशयोग्य बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे आरोग्य विमा क्षेत्रातील वाढ साधली जाईल.”
प्रमुख राइडर वैशिष्ट्ये:
1. एम्पॉवरहर: PCOS, वंध्यत्व, स्त्रीरोग संबंधित समस्या, महिलांमध्ये विशेष करून आढळणारे कर्करोग आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश असलेल्या महिलांच्या संपूर्ण आरोग्य समस्यांसाठी विमा संरक्षण देणारे समर्पित राइडर. यात गर्भाशय ग्रीवेचा कर्करोग प्रतिबंधक लसीकरण यांसारख्या प्रतिबंधात्मक उपाय संरक्षणाचा देखील समावेश आहे.
2. मेंटल वेलबीइंग: मानसिक आरोग्य विषयक समस्यांसाठी या उद्योगक्षेत्रात प्रथमच विमा संरक्षण. लवकर आणि वेळेवर निदान आणि उपचार यावर भर देत यामध्ये मानसिक आरोग्य तपासण्या, मानसोपचार, पुनर्वसन सेवा यांचा समावेश
3. कॅनकेअर: विशिष्ट तीव्रतेच्या कॅन्सरचे निदान झाल्यास निश्चित विमा रकमेचे एकरकमी पेमेंट देणारे विस्तारित कॅन्सर कव्हर.
4. ओपीडी केअर: दैनंदिन आरोग्य गरजा पूर्ण करण्याचे सुनिश्चित करत डॉक्टरांशी सल्लामसलत, निदान, औषध खरेदी, आणि व्हिजन कव्हर यांसारख्या बाह्यरुग्ण खर्चासाठी संरक्षण
5. फ्लेक्सी शिल्ड: वैद्यकीय महागाईपासून पॉलिसीधारकांना संरक्षित करण्यासाठी तयार केलेले रिस्टोअर इन्फिनिटी+ सह विमा रकमेचे अमर्याद रिस्टोरेशन आणि वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या संरक्षणासाठी इन्फ्लेशन शिल्ड, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर दुसरे वैद्यकीय मत, आधीपासून असलेल्या आजारासाठी/ आजारांसाठी 31 दिवसांचे विमा संरक्षण, जगभरात रुग्णालय कॅश आणि इतर प्रीमियम फायदे देते.
220 पेक्षा जास्त ठिकाणी उपस्थिती आणि 11,700 हून अधिक हॉस्पिटल्सच्या नेटवर्कसह, TATA AIG आरोग्य विमा क्षेत्रात नाविन्यपूर्णतेला चालना देण्यासाठी आणि राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा विस्तारण्यासाठी सज्ज आहे.