युवा नेते व उद्योजक मिलिंद नंदकुमार वाळंज यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात
पुणे, २४ सप्टेंबर – मममिलिंद यांचे वडिल नंदकुमार वाळंज यांनी मुळशी भागातील लोकांसाठी सामाजिक कार्य केले आहे. त्यांचाच वारसा पुढे मिलिंद नेत आहेत. ते करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे.फफ असे गौरवोद्गार खासदार ओमराजे निंबाळकर यांनी काढले.
मिलिंदादा वाळंज युवा मंच व मित्र परिवार यांच्यावतीने मिलिंद नंदकुमार वाळंज यांचा अभिष्टचिंतन सोहळा अॅम्बेव्हॅली येथे नुकताच पार पडला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. तसेच, मुळशी भागातील वारकरी संप्रदायात योगदान देणार्या संस्था व मान्यवरांना विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार (बाबुजी) वाळंज व शिवसेनेचे आमदार कैलास पाटील उपस्थित होते. तसेच सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
खा. ओमराजे निंबाळकर म्हणाले, मुळशी भागातील लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन वाळंज कुटुंब सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अनेक वर्षांपासून कार्य करीत आहेत. वाळंज कुटुंबाचा वारसा मिलिंद पुढे चालवत आहेत. ते करीत असलेल्या सामाजिक कार्याचा गौरव आज येथे होताना दिसत आहे. भविष्यात सामाजासाठी उपयोगी असे कार्य त्यांच्या हातून घडावे ही सदिच्छा.
मिलिंद वाळंज म्हणाले, येथील जनतेसाठी चांगले काम करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न आहे. जनतेची इच्छा आणि भविष्यात निवडणूक लढवायची संधी मिळाली तर मी नक्कीच विचार करेन. आमच्या आई वडिलांनी या क्षेत्रात समाजसेवेचे व्रत घेऊन पाया रचला आहे. आता त्यावर कळस बांधण्याचे कार्य आम्ही करू.
रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांनी मिलिंद वाळंज यांना शुभाशिर्वाद देऊन कीर्तनरूपी सेवा सादर केली.
या कार्यक्रमात सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.