आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पुणे शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर आणि अनधिकृत प्री-स्कूलवर सभागृहात व्यक्त केली तीव्र चिंता

Date:

तातडीने कारवाई करण्याची केली मागणी.

पुणे:महाराष्ट्र विधानमंडळाच्या चालू पावसाळी अधिवेशनादरम्यान, शिवजीनगर मतदारसंघाचे आमदार श्री. शिरोळे यांनी पुणे शहरातील वाढत्या नागरी समस्यांकडे, विशेषतः रस्त्यांवरील वाढते अतिक्रमण आणि अनधिकृतपणे सुरू असलेल्या प्री-स्कूल (नर्सरी) शाळांवर सभागृहाचे लक्ष वेधले. नियम २९३ च्या प्रस्तावावर बोलताना त्यांनी या गंभीर बाबींवर राज्य सरकारने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी केली.
पुणे शहराच्या विकासाला अतिक्रमणामुळे गालबोट लागत असून, पुणेकरांमधून यावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आमदार शिरोळे यांनी फर्ग्युसन कॉलेज रस्त्याचे उदाहरण देत सांगितले, “मी स्वतः फर्ग्युसन कॉलेज परिसरात राहतो. हा रस्ता केवळ पुण्यासाठीच नव्हे, तर जगभरात एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रतिष्ठित रस्ता म्हणून ओळखला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणावर अनधिकृत खोकी आणि बॉक्सेस लावून अतिक्रमण करण्यात आले आहे. हे वाढत जाणारे अतिक्रमण म्हणजे पुणे शहराला लागलेला एक मोठा कॅन्सर ठरत आहे. पूढील काही वर्षांत हे वेळेत रोखले नाही, तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
तसेच अनधिकृत प्री-स्कूल आणि नर्सरींवर नियंत्रणाची आहे असा मुद्दा उपस्थित केला. या शाळा कोणत्याही ठोस नियमावलीशिवाय किंवा सुरक्षेच्या मानकांशिवाय सुरू आहेत. यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेला आणि भविष्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
अखेर, पुणे शहरातील हे वाढते अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे, तसेच विनापरवाना चालणाऱ्या बालवाड्या या दोन्ही संवेदनशील विषयांवर राज्य सरकारने पुणे महानगरपालिका आणि संबंधित प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी अध्यक्ष महोदयांमार्फत शासनाला केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

साचलेल्या पाण्यात करंट उतरल्याने 17 वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई-मुंबई-ठाण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान आणखी एक धक्कादायक घटना...

भारतातील 84% महिला उद्योजिका डिजिटल पेमेंट साधनांचा करतात वापर

डीबीएस बँक इंडियाच्या ‘वुमन अँड फायनान्स’ संशोधन अभ्यासातील निष्कर्ष पेमेंट्सपलीकडे...

भीमाशंकर परिसरातील आदिवासी-कातकरी विद्यार्थ्यांना शालेय क्रीडा साहित्य व शालेय वस्तूंचे वाटप

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

भाजप पुणे शहराच्या ‘शासकीय योजना प्रमुख’पदी गणेश शेरला यांच्या निवड

तीन दशकांच्या सामाजिक- राजकीय अनुभवाची दखल; धीरज घाटे यांच्या...