भाजप पुणे शहराच्या ‘शासकीय योजना प्रमुख’पदी गणेश शेरला यांच्या निवड

Date:

तीन दशकांच्या सामाजिक- राजकीय अनुभवाची दखल; धीरज घाटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

पुणे : सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात गेली तीन दशके सातत्याने कार्यरत असलेले, एकता सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश शेरला यांची भारतीय जनता पार्टी, पुणे शहरच्या ‘शासकीय योजना प्रमुख’पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहर भाजप अध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले असून यावेळी त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

गणेश शेरला यांनी गेल्या तीन दशकांत सामाजिक बांधिलकी जपत विविध स्तरांवर उल्लेखनीय कार्य केले आहे. गुलटेकडी एकता सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, भारतीय जनता पक्ष झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष, पर्वती उपाध्यक्ष तसेच पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळत त्यांनी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पक्षाची भूमिका आणि शासनाच्या लोककल्याणकारी योजना पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

त्यांच्या दीर्घ सामाजिक व राजकीय अनुभवाचा लाभ पुणे शहरातील पक्षसंघटन अधिक मजबूत करण्यासाठी होईल, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.

‘राष्ट्र प्रथम’ या विचाराने प्रेरित होऊन पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे यशस्वीपणे पालन कराल आणि भारतीय जनता पक्षाचा विचार अधिक व्यापकपणे जनतेपर्यंत पोहोचवाल, असा विश्वास व्यक्त करत धीरज घाटे यांनी गणेश शेरला यांना भावी सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भीमाशंकर परिसरातील आदिवासी-कातकरी विद्यार्थ्यांना शालेय क्रीडा साहित्य व शालेय वस्तूंचे वाटप

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

२४ तासांत खडकवासला धरण साखळीत ०.२० टीएमसीची वाढ

💧 एकूण पाणीसाठा : ३.९७ टीएमसी (१३.६१%) पुणे | पुणे...

पुणे-रायगडला ‘रेड’ तर मुंबईला ‘ऑरेंज’ अलर्ट

मुंबई -अरबी समुद्रात तब्बल १५ दिवस रेंगाळल्यानंतर मान्सूनने आता...