२४ तासांत खडकवासला धरण साखळीत ०.२० टीएमसीची वाढ

Date:

💧 एकूण पाणीसाठा : ३.९७ टीएमसी (१३.६१%)

पुणे |

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत गेल्या २४ तासांत पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. ३ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतच्या अहवालानुसार चारही धरणांतील एकूण पाणीसाठा ३.९७ टीएमसी (१३.६१ टक्के) इतका झाला असून, गुरुवारीच्या तुलनेत ०.२० टीएमसीची वाढ झाली आहे.

गेल्या २४ तासांत चारही धरण क्षेत्रात मिळून १९५ एमसीएफटी पाण्याची आवक झाली. यामध्ये पानशेत धरणात १२२ एमसीएफटी तर वरसगाव धरणात ८३ एमसीएफटी पाण्याची भर पडली. खडकवासला धरणात आवक नसून साठ्यात किरकोळ घट झाली आहे. तेमघर धरणातही साठ्यात कोणताही बदल झालेला नाही.

पावसाच्या नोंदी पाहता पानशेत परिसरात ५३ मिमी, वरसगावमध्ये ४७ मिमी, खडकवासला येथे ८ मिमी तर तेमघर येथे ४० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, याच दिवशी मागील वर्षी चारही धरणांमध्ये १६.४१ टीएमसी (५६.३० टक्के) पाणीसाठा होता. यंदा अद्यापही पाणीसाठा तुलनेने कमी असला, तरी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरण साखळीतील साठा हळूहळू वाढू लागल्याने पुणेकरांना दिलासा मिळू लागला आहे.

📊 २४ तासांतील बदल

धरण२ जुलै३ जुलैबदल
खडकवासला0.31 TMC (15.47%)0.30 TMC (14.97%)-0.01 TMC
पानशेत1.86 TMC (17.44%)1.98 TMC (18.58%)+0.12 TMC
वरसगाव1.61 TMC (12.56%)1.69 TMC (13.21%)+0.08 TMC
टेमघर0.00 TMC0.00 TMCबदल नाही
एकूण3.77 TMC (12.94%)3.97 TMC (13.61%)+0.20 TMC
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भाजप पुणे शहराच्या ‘शासकीय योजना प्रमुख’पदी गणेश शेरला यांच्या निवड

तीन दशकांच्या सामाजिक- राजकीय अनुभवाची दखल; धीरज घाटे यांच्या...

पुणे-रायगडला ‘रेड’ तर मुंबईला ‘ऑरेंज’ अलर्ट

मुंबई -अरबी समुद्रात तब्बल १५ दिवस रेंगाळल्यानंतर मान्सूनने आता...

कोठडीतील मृत्यू प्रकरणी 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा; 15 वर्षांनंतर न्याय

वाशीम -वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने एका अत्यंत गंभीर आणि...