पुणे (प्रतिनिधी): “महिलांवरील गेल्या काळातील वाढते हिंसाचार पाहता रात्री बाहेर पडायची भीती वाटते.” “या घटनांमुळे आम्हाला घरच्यांकडून सतत विचारणा होत असते, ‘कुठे आहेस? कोणाबरोबर आहेस? फार उशीर करू नकोस.'” हे अनुभव आहेत, एका मध्यमवयीन महिलेचा आणि दुसरा नुकत्याच नोकरीला लागलेल्या मुलीचा. त्या बोलत होत्या त्याला निमित्त होतं अभिव्यक्ती आयोजित महिला हिंसाचारविरोधी सडेतोड सडक नाटक ‘आता बास’ याचे.महिलांवरील वाढत्या हिंसाचारा विरोधात अभिव्यक्ती संघटना गणेश उत्सवात बाजीराव रोड येथे आता बास नावाचे नाटक सादर करत आहे. नाटक वाढत्या हिंसाचाराच्या मुळाशी जी स्त्री पुरुष असमानतेची व्यवस्था आहे त्यावर बोलते. जे लोकांना प्रश्न पडायला उद्युक्त करते आणि स्त्री पुरुष दोघेही आपले, आपल्या आसपासचे अनुभव सांगतात. नाटकानंतर मी शपथ घेतो/घेते की,
मी महिलांचा सन्मान करेन, मी महिलांशी आदराने वागेन महिलांवर होणारा हिंसाचार मी खपवून घेणार नाही. कोणत्याही ठिकाणी जर महिलांवर छेडछाड किंवा अत्याचार होत असेल तर मी त्याविरोधात आवाज उठवेन.
ही शपथ घेण्यात नागरिक सामील होत आहेत. तसेच, त्याच ठिकाणी स्त्री पुरुष समानता रुजवण्यासाठी काही आकर्षक खेळ खेळण्यातही नागरिक उत्तम प्रकारे सामील होत आहेत.