पुणे-
३६व्या पुणे फेस्टिव्हलच्या श्रींची प्रतिष्ठापना शनिवार दि. ०७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता हॉटेल सारस, नेहरू स्टेडियम, पुणे येथे माजी विभागीय आयुक्त व रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी व सौ. पद्मा दळवी यांच्या शुभहस्ते विधिवत संपन्न झाले. वेदमूर्ती पं. धनंजय घाटे गुरूजी यांनी याचे पौरोहित्य केले. दुपारी पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांचा हस्ते श्री गणेशाची पूजा होऊन आरती झाली. हॉटेल सारस नेहरू स्टेडीयम येथे आकर्षक सजावट करण्यात आली आहे. याप्रसंगी पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड, डॉ. सतीश देसाई, बाळासाहेब अमराळे, राजू साठे, सचिन साळुंके, प्रसन्न गोखले, अतुल गोंजारी, अशोक मेमजादे, सुप्रिया ताम्हाणे, अनुराधा भारती, विद्या खळदकर, विनोद सुर्वे, नामदेव चाळके, सचिन खवले, विजय शेटे, सुरेश चौधरी आदि उपस्थित होते.