● वित्त वर्ष 23-24 मध्ये भारतीयांचा स्वतःचा सिबिल स्कोर आणि अहवाल 51% वाढला
● गैर-मेट्रो क्षेत्रांमध्ये स्वयं-निरीक्षण करणारे ग्राहक 57% वाढले तर एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत मेट्रो क्षेत्रांमध्ये 33% वाढ झाली आहे.
● वित्त वर्ष 24 मध्ये 12% अधिक व्यावसायिक संस्थांनी (MSMEs) प्रथमच त्यांचा कंपनी क्रेडिट अहवाल (CCR) ट्रॅक केला
मुंबई, – संपूर्ण भारतातील ग्राहकांच्या स्व-निरीक्षणाच्या क्रेडिट वर्तनातील सर्वसमावेशक माहिती असणारा आर्थिक स्वातंत्र्याचे सशक्तीकरण : भारतातील क्रेडिट सेल्फ–मॉनिटरिंगचा उदय हा अहवाल ट्रान्सयुनियन सिबिलने प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, मार्च 2024 पर्यंत अंदाजे 119 दशलक्ष भारतीयांनी त्यांच्या सिबिल स्कोअरचे परीक्षण केले आहे. क्रेडिट प्रोफाइलचे निरीक्षण करणाऱ्या ग्राहकांची संख्या वित्त वर्ष 23-24 मध्ये 51% (वार्षिक आधारावर) वाढून 43.6 दशलक्षची भर पडली आहे. अधिक ग्राहक त्यांची क्रेडिटची स्थिती जाणून घेण्याची इच्छा असते, हे यातून दिसून येते.
अहवालात दिसून आले आहे की भारतातील क्रेडिट क्रांतीचे नेतृत्व तरुण करत आहेत. 119 दशलक्ष क्रेडिट मॉनिटरिंग ग्राहकांपैकी 77% जनरेशन झेड2 आणि मिलेनियल्स3 आहेत. अहवालात असेही दिसून आले आहे की 81% ग्राहक ज्यांनी त्यांचे पहिले क्रेडिट उत्पादन उघडल्यानंतर सहा महिन्यांच्या आत त्यांच्या क्रेडिट स्कोअरचे स्व-निरीक्षण सुरू केले आहे, ते गैर-मेट्रो प्रदेशातील आहेत.
स्रोत: ट्रान्सयुनियन सिबिल सेल्फ–मॉनिटरिंग डेटाबेस
अहवालातील निष्कर्षांवर भाष्य करताना, ट्रान्सयुनियन सिबिलचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री राजेश कुमार म्हणाले : “या अहवालात स्पष्ट केल्याप्रमाणे क्रेडिट व्यवस्थापनाबद्दल सुधारित ग्राहक जागरुकतेसह भारताच्या वृद्धीला मजबूत पाया मिळतो. जे ग्राहक त्यांच्या क्रेडिट अहवालाचे स्व-निरीक्षण करतात आणि त्यानंतर त्यांचा सिबिल स्कोर सुधारतात अशा लोकांमध्ये यात उल्लेखनीय वाढ दिसून येते. ग्राहक जागरूकता वाढत असून, विशेषत: तरुण, महिला आणि गैर-शहरी ग्राहकांमध्ये झालेली ही वाढ, शाश्वत पत वाढ आणि वाढत्या आर्थिक समावेशाचे आश्वासक सूचक आहे. येत्या काही वर्षांत आपल्या देशाचे USD 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेने ते चांगले संकेत आहेत.
“ग्राहकांना सक्षम बनवण्यासाठी आणि आर्थिक संधींचा सहज आणि चांगल्या अटींवर लाभ घेण्यासाठी चांगल्या क्रेडिट स्कोअरच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ट्रान्सयुनियन सिबिल वचनबद्ध आहे. आमचे उपाय भारतातील लाखो लोकांसाठी आर्थिक संधी निर्माण करण्यात मदत करतात आणि आम्ही क्रेडिट व्यवस्थापनाबद्दल ग्राहक जागरूकता वाढवण्याची आमची जबाबदारी अत्यंत गांभीर्याने घेतो. भारतातील अग्रणी क्रेडिट माहिती कंपनी म्हणून, ट्रान्सयुनियन सिबिल सार्वजनिक हितासाठी क्रेडिट माहिती क्षेत्र मजबूत करण्यासाठी सदस्य क्रेडिट संस्थांसोबत सतत काम करत आहे.”
वित्त वर्ष 23-24 मध्ये सिबिल स्कोअरचा मागोवा घेणाऱ्या महिलांच्या वाट्यामध्ये 70% वाढ झाल्याचे या अहवालातून दिसून येते. स्त्रिया केवळ क्रेडिट व्यवस्थापन चांगल्या प्रकारे समजून घेत नाहीत तर त्या अधिक क्रेडिट जागरूक बनत आहेत आणि आर्थिक नियोजनाला प्राधान्य देत आहेत असेही यातून स्पष्ट होते.. 72% पेक्षा जास्त नवीन क्रेडिट मॉनिटरिंग महिला या महानगरांतील नाहीत.
क्रेडिट बघण्याचे अधिक प्रमाण व्यापक आर्थिक सहभागाकडे नेणारे
अहवालात असे म्हटले आहे की ग्राहक अधिक क्रेडिट जागरूक होत आहेत. त्यामुळे असे दिसून येते की सिबिल स्कोअर आणि अहवाल तपासल्यानंतर सहा महिन्यांच्या आत 46% लोकांच्या क्रेडिट प्रोफाइलमध्ये सुधारणा झाली आहे (सिबिल स्कोर4). क्रेडिट स्कोअरवर भर न देणाऱ्या ग्राहकांच्या तुलनेत हे प्रमाण 41% पेक्षा जास्त आहे.यातून हे स्पष्ट होते की, क्रेडिट जागरूक असलेले भारतीय अधिक क्रेडिट उत्पादनांचा शोध घेत आहेत आणि कमी व्याजदर, चांगल्या ऑफर किंवा उच्च क्रेडिट रकमेचा लाभ घेण्यासाठी त्यांचे स्कोअर देखील सुधारत आहेत.
तीन महिन्यांच्या आत त्यांचा स्कोअर तपासणे, स्व-निरीक्षण करणाऱ्यांच्या संख्येत नॉन-मॉनिटरिंग ग्राहकांच्या तुलनेत ग्राहकांनी नवीन क्रेडिट लाइन उघडण्यात सुमारे 6X वाढ दर्शविल्याचे अहवालात दिसून आले आहे.डेटा दर्शवितो की 44% ग्राहक त्यांच्या सिबिल स्कोअरचे निरीक्षण करत आहेत आणि 12 महिन्यांत किमान चार वेळा ते आपला स्कोअर बघतात, असेही दिसले आहे.
स्वयं-निरीक्षण करणारे ग्राहक त्यांच्या क्रेडिट इतिहासाचे पुनरावलोकन केल्यानंतर क्रेडिट संधींसाठी अर्ज करतात, यावरही हा अहवाल प्रकाश टाकतो. निरीक्षणानंतर, दुचाकी कर्ज घेणारे 50%, ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी कर्जे 41%, सुवर्ण कर्ज 38% आणि क्रेडिट कार्ड प्रमाण 14% वाढले आहेत. तथापि, वैयक्तिक कर्ज 16% कमी झाले. पुढील स्थानानुसार आकडेवारी पाहिली तर असे दिसून येते की, गैर-मेट्रो भागातील स्वयं-निरीक्षण ग्राहकांनी अधिक नवीन क्रेडिट खाती उघडली आहेत.
स्वयं–निरीक्षण व्यवसाय संस्था चांगली क्रेडिट प्रोफाइल ठेवतात
अहवालात असेही दिसून आले आहे की, प्रथमच त्यांचा कंपनी क्रेडिट रिपोर्ट (सीसीआर) तपासणाऱ्या व्यावसायिक संस्था वित्त वर्ष 23-24 मध्ये 12% (वार्षिक आधारावर) वाढल्या आहेत आणि स्व-निरीक्षण करणाऱ्या 47% संस्था व्यावसायिक रँक 1 आणि 3 दरम्यान राखतात (एसएस सिबिल MSME रँक)५), CMR-1 स्कोअर सर्वात कमी धोकादायक प्रोफाइल दर्शवतो. अहवालात असेही दिसून आले आहे की सीसीआर तपासल्यानंतर तीन महिन्यांच्या आत 32% व्यावसायिक संस्थांनी कर्जासाठी अर्ज केला आहे, ज्यामध्ये व्यावसायिक वाहन कर्ज, बँक हमी, दीर्घकालीन कर्ज, असुरक्षित व्यवसाय कर्ज आणि वाहन कर्ज यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
स्रोत: ट्रान्सयुनियन सिबिल सेल्फ–मॉनिटरिंग डेटाबेस
क्रेडिटबद्दल जागरुकता वाढल्याने ग्रामीण भारतात पत वाढीला चालना
अहवालात असे दिसून आले आहे की, क्रेडिटचे निरीक्षण करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत लक्षणीय सुधारणा झाली आहे, विशेषत: नॉन-मेट्रो ठिकाणी स्व-निरीक्षण करणारे ग्राहक वित्त वर्ष 23-24 मध्ये 57% वाढले आहेत, मेट्रो शहरांमध्ये हे प्रमाण 33% वाढले आहे.
अहवालात असेही दिसून आले आहे की, वित्त वर्ष 23-24 मध्ये 4.72 दशलक्ष नवीन प्रादेशिक स्व-निरीक्षण ग्राहक होते, जे वाढत्या क्रेडिट जागरूकतेचे प्रतीक आहे. सर्वाधिक क्रेडिट मॉनिटरिंग लोकसंख्या असलेल्या टॉप 10 राज्यांमध्ये, केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल यांनी FY22-23 च्या तुलनेत वित्त वर्ष 23-24 मध्ये स्व-निरीक्षण ग्राहकांमध्ये वाढ केली.
स्रोत: ट्रान्सयुनियन सिबिल सेल्फ–मॉनिटरिंग डेटाबेस
स्व–निरीक्षण१ महिला कर्जदारांचा क्रेडिट आत्मविश्वास वाढला
जसजसे अधिक महिलांना क्रेडिटचे परिणाम आणि शक्यता समजतात, तसतसे भारताच्या क्रेडिट मार्केटमध्ये अधिक माहितीदार कर्जदार वाढू लागले आहेत. क्रेडिटसाठी स्व-निरीक्षण करणाऱ्या महिला ग्राहकांमध्ये 70% वाढ दर्शविते की महिला आर्थिक नियोजनाला प्राधान्य देत आहेत आणि त्यांच्या क्रेडिट हेल्थची जबाबदारी घेत आहेत. सिबिल स्कोअर 730+ असलेल्या महिला ग्राहकांच्या संख्येत वित्त वर्ष 23-24 मध्ये 1.8 पट वाढ झाली आहे..
वित्त वर्ष 23-24 मध्ये प्रथमच त्यांच्या सिबिल स्कोअर आणि अहवालात प्रवेश केलेल्या 71 टक्के महिला या नॉन-मेट्रो भागातील होत्या. या क्षेत्रांमध्ये क्रेडिटच्या बाबतीत झपाट्याने वाढ झाल्याचे दर्शविते. संख्यास्व-निरीक्षण करणाऱ्या जनरेशन झेड महिलांची संख्या FY22-23 च्या तुलनेत वित्त वर्ष 23-24 मध्ये 70% एवढी प्रचंड वाढली आहे.
स्रोत: ट्रान्सयुनियन सिबिल सेल्फ–मॉनिटरिंग डेटाबेस
तरुण कर्जदार अधिक क्रेडिट माहितीगार आणि क्रेडिट क्रांतीमध्ये महत्त्वाचे योगदान देणारे होत आहेत
अहवालातील माहिती असे सूचित करते की, तरुण कर्जदार अधिक क्रेडिट शिस्तबद्ध आणि जागरूक होत आहेत – क्रेडिट स्कोअरचा मागोवा घेणाऱ्या जनरेशन झेडची संख्यावित्त वर्ष 23-24 मध्ये 1.5 पट वाढली आहे. नवीन क्रेडिट वापरकर्त्यांपैकी 91 टक्के वित्त वर्ष 23-24 मध्ये मिलेनियल्स आणि जनरेशन झेड होते. सुरुवातीलाच लागलेली ही सवय संकेत देते की या पिढ्या भारताच्या ग्राहक पत भविष्याला आकार देतील.
सुरुवातीच्या काळापासूनच क्रेडिट सांभाळण्याची सवय भारतीय तरुणांना लागत आहे. या गटात स्व-निरीक्षण करणारे जनरेशन झेड ग्राहक सरासरी 1.32 सह आघाडीवर असून ते 1.25 वरील मिलेनियल्स आणि इतरांना 1.22 वरील मागे टाकतात. सरासरी, स्व-निरीक्षण करणारे ग्राहक 1.98 उत्पादने ठेवतात, जे त्यांच्या गैर-निरीक्षण भागांपेक्षा अधिक आहेत. निरिक्षण न करणाऱ्या ग्राहकांकडे सरासरी 1.33 उत्पादने असतात.
“भारत झपाट्याने आर्थिकदृष्ट्या जाणकार आणि क्रेडिट जागरूक होत असल्याचे वास्तव या अहवालातून समोर येते. ज्यांच्याकडे सिबिल स्कोअर जास्त आहे अशा कर्जदारांसाठी अनेक क्रेडिट संस्था चांगल्या अटी आणि शर्ती ऑफर करतात, ग्राहकांना चांगल्या अटींवर आर्थिक संधींचा लाभ घेण्यासाठी निरोगी क्रेडिट प्रोफाइलचे निरीक्षण करणे आणि राखणे फायदेशीर ठरते,” असे ट्रान्सयुनियन सिबिल इंडियाचे वरिष्ठ संचालक आणि ग्राहक संवाद (डायरेक्ट–टू–कंझ्युमर) प्रमुख भूषण पडकील यांनी सांगितले.
1स्व-निरीक्षण करणारे ग्राहक हे असे यूजर्स आहेत ज्यांनी त्यांचे सिबिल स्कोअर सक्रियपणे तपासले आणि किमान एकदा ट्रान्सयुनियन सिबिलला आपला अहवाल दिला आहे..
2जनरेशन झेड हे असे ग्राहक आहेत ज्यांचा जन्म 1997 ते 2012 या काळात झालेला आहे.
3मिलेनियल्स हे ग्राहक 1981 ते 1996 या काळात जन्मलेले आहेत.
4सिबिल स्कोअर हा 300-900 दरम्यान असतो. 300 ते 680 असलेला सिबिल स्कोअर सबप्राईम मानला जातो, 681-730 दरम्यान स्कोअर असेल तर नीअर प्राईम ग्राहक असतात.प्राईप = 731-770, प्राईम प्लस = 771-790 आणि super prime = 791-900 असा स्कोअर असतो.
सिबिल एमएसएमई रॅकची रेंज 10 ते 1. 1 ही सर्वोत्तम रँक असते.