Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

दीडशे वर्षांपूर्वीच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तूंची छायाचित्रांतून पुनर्भेट

Date:

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे प्रदर्शनाचे आयोजन; वास्तुविशारदतज्ज्ञ डॉ. सारा मेल्सेन यांच्या अभ्यासवृत्तीचे दर्शन
पुणे, ता. २: पुण्याची ओळख सांस्कृतिक राजधानी, पूर्वेचे ऑक्सफर्ड, आयटी हब, वाहन उद्योगाची नगरी, अशा अनेक नावांनी आहे. पण गेल्या सुमारे दीडशे ते पावणेदोनशे वर्षांपूर्वीपासून पुण्याच्या बांधकाम आणि वास्तुविशारद क्षेत्राने कशी वाटचाल केली, याचे मनोहारी दर्शन ‘रिकलेक्टिंग पुणेज इंजिनिअर्स अँड बिल्डर्स’ या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाच्या निमित्ताने पुणेकरांनी घेतले. दीडशे वर्षांपूर्वी उभारलेल्या आणि आजही नित्य वापरात असलेल्या काही वास्तूंची पुनर्भेट या निमित्ताने पुणेकरांना आणि अभ्यासकांना घडली.

निमित्त होते बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (बीएआय) पुणे लोकल सेंटरच्या सहकार्याने आयोजित वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शन आणि मुक्त संवादाचे. पुण्याचे वैभव असणाऱ्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात हे प्रदर्शन झाले. वास्तुविशारदतज्ञ डॉ. सारा मेल्सेन यांना नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च, फ्रान्सकडून मिळालेल्या अभ्यासवृत्तीचा एक भाग म्हणून या अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात डॉ. सारा यांनी परिश्रमपूर्वक मिळवलेली अस्सल आणि अधिकृत छायाचित्रे, त्यातील वास्तू, व्यक्ती आणि तत्कालीन साधनसामग्रीचे तपशील, डॉ. सारा यांनी स्वतः केलेले स्पष्टीकरण, यामुळे सुमारे दीडशे वर्षांच्या कालखंडातील पुण्यातील अनेक वारसास्थळे आणि वैशिष्ट्यपूर्ण वास्तूंचा एक स्मरणरम्य प्रवास पुणेकरांसमोर उलगडला.

रावबहादूर गणपत केंजळे (१८४४ ते १९२०), विष्णुपंत रानडे, गणेश आपटे, नारायणराव कानेटकर, वसंत भाटे, बी. जी. शिर्के अशा अनेक बुजुर्ग वास्तूविशारद आणि बांधकाम व्यावसायिकांनी तत्कालीन पुण्यात तसेच इतरत्र उभारलेल्या वैभवशाली वास्तू छायाचित्रांच्या माध्यमातून पुणेकरांसमोर आल्या. ‘बीएआय’चे अध्यक्ष सुनील मते, उपाध्यक्ष अजय गुजर, सचिव राजाराम हजारे, खजिनदार शशिकांत किल्लेदारपाटील, संशोधक रिचा शहा यांच्यासह संस्थेचे माजी अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. 
डॉ. सारा म्हणाल्या, “वास्तुविशारद अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी आणि संशोधक-अभ्यासक या नात्याने मला या वास्तू वैशिष्ट्यपूर्ण वाटल्या. तत्कालीन बांधकामाच्या पद्धती, वास्तू आरेखन, वापरली जाणारी साधने, अन्य बांधकाम सामग्री, यंत्रे आणि अर्थातच मनुष्यबळ हे सारे समजून घेणे हा त्या काळाचा नव्याने केलेला अभ्यास होता. या प्रदर्शनातील प्रत्येक छायाचित्र तत्कालीन समाजजीवनाचेही दर्शन घडवते. एका छायाचित्रात तर आठवड्याच्या पगाराचा दिवस आहे, मात्र पगार म्हणून पैसे नव्हे तर धान्य वाटले जात आहे. या प्रत्येकाचे दर्शन या छायाचित्रांतून समोर येते. बांधकामाच्या सामग्रीत कसे बदल होत गेले, पारंपरिक बांधकामाच्या पद्धती कशा होत्या, वाहतूक व्यवस्था कशी होती, हे सारे यातून समोर येते.”

‘बीएआय’चे अध्यक्ष सुनील मते म्हणाले, “या प्रदर्शनाच्या निमित्ताने आपल्या शहराच्या गतकाळाचा एक दीर्घ वास्तूपट पुणेकरांसमोर आला. त्यातही सर्वांत जुन्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात हे प्रदर्शन आयोजित केल्याने विषयाचे औचित्य साधले गेले. या प्रदर्शनातील छायाचित्रे दीडशे वर्षांपूर्वीच्या काळातील अनेक वास्तूंची पुनर्भेट घडवणारी आहेत. सांगलीचा आयर्विन पूल, तापी नदीवरील पूल, भीमा नदीवरील पूल, पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज पूल, पेरणे येथील पूल, पुण्याच्या रेल्वे स्थानकाची वास्तू, पहिल्या हाऊसिंग सोसायटीज, अपार्टमेंट संस्कृती, स्वतंत्र बंगल्यांची कॉलनी हे सारे पाहताना नगररचना विभागाच्या निर्मितीपूर्वीच्या वास्तू आणि नंतरच्या वास्तू, असा ठळक फरक अनुभवता आला.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लवकरच जाहीर होणार गट क लिपिक व टंकलेखक परीक्षेचा अंतिम निकाल

https://www.youtube.com/live/fFVATRwAxP4?si=7g1Z8-YHQWZYClCS एमपीएससीच्या कारभारावर आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत लक्षवेधी मुंबई/ पुणे...

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन शिक्षेत वाढ:सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या विधेयकाचे झाले काय?

दारूबंदी सुधारणा विधेयक 2025 घेतले मागे... मुंबई-सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून...

दारुबंदी विधेयक सुधारणेसाठी सभागृहात आमदार महेश लांडगे यांनी मांडली आक्रमक भूमिका

कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांचे सर्वंकष उपाययोजनांचे निर्देश मुंबई/ पिंपरी-चिंचवड...

चाकूर च्या माजी नगराध्यक्षांसह शरद पवार गट, ‘प्रहार’ च्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत मुंबई, 11 जुलै...