पुणे- देशी बनावटीचे पिस्टल बाळगलेल्या एका २१ वर्षाच्या तरुणाला चतुश्रुंगी पोलिसांनी पकडले आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक ३१/०८/२०२४ रोजी चतुशृंगी पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गस्त करत असताना सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत कुणाल लांडगे यांच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी पथकासह सापळा रचून कुणाल संतोष लांडगे वय 21 वर्ष राहणार आंबेडकर वसाहत डीपी रोड औंध पुणे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे ३१,०००/- रुपये किमतीचे एक लोखंडी देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळून आल्याने त्यास अटक करून चतुश्रुंगी पोलीस स्टेशन गुन्हा नोंद क्रमांक ७११/२०२४ अर्म ॲक्ट कलम ३(२५) सह म पो अधि ३७(१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त पुणे शहर रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 पुणे शहर हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग श्रीमती अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी चतुशृंगी पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक गुन्हे युवराज नांद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पो उ नि प्रणील चौगुले व तपास पथकातील अंमलदार यांनी केली आहे.