पुणे-गेल्या काही काळात देश आणि राज्यात घडलेल्या घटनांमुळे महिला सुरक्षा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला यावर सर्वांनी मिळून उपाययोजना कराव्या लागतील. पुणे शहरात सुमारे १२०० माध्यमिक आणि प्रार्थामिक शाळांमध्ये ११ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्यापर्यंत आमचा संदेश पोहचवा. शाळा परिसरात सुरक्षा आणि विद्यार्थी ये-जा करताना सुरक्षा हे महत्वाचे आहे. शाळेच्या १०० मीटर परिसरात सिगरेट, गुटखा, अंमली पदार्थ विक्रीस बंदी आहे, त्याबाबत माहिती दिल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिस आयुक्त आमितेश कुमार यांनी सांगीतले.
आमितेश कुमार पुढे म्हणाले, कोणी शाळा व्यवस्थापनवर दमदाटी करणार नाही हे काय रावण राज्य नाही, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. अशा पान टपरी नष्ट करण्याची मोठी मोहीम हाती घ्यावी लागेल, असे मत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केले.
पुणे पोलिस आयुक्तालयच्या वतीने गणेश कला क्रीडा रंगमंदिर येथे ‘शाळा सुरक्षा परिषद’ आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिक्षण विभागाचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक संचालक संपत सुर्यवंशी, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, प्रवीण कुमार उपस्थित होते.
अमितेश कुमार म्हणाले, प्रत्येक शाळेत ट्रान्सपोर्ट कमिटी असावी त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. रिक्षात गरजेपेक्षा अधिक विद्यार्थी बसवले जातात हे दुर्देवी आहे. त्यात अपघात होण्याची संख्या अधिक आहे. मुलांच्या आत्मसन्मानाने ये -जा करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये असे प्रयत्न करण्यात यावे. ऑनलाईन चारित्र्य पडताळणी चालकांची गरजेची आहे ते शाळेने तात्काळ करावे. शाळा परिसरात सीसीटिव्ही लावणे त्याची देखभाल पाहणे आवश्यक आहे. पोलीस दीदी उपक्रम आणखी बळकट करणार आहे. हेल्पलाईन नंबर नोटीस बोर्डवर लावण्यात यावे. पुण्याची लोकसंख्या ७० लाख असून शहरात नऊ हजार पोलिस मनुष्यबळ उपलब्ध आहे. आम्ही आमची सुरक्षा जबाबदारी टाळत नाही. तुम्ही आमचे कान आणि डोळे होऊन माहिती आम्हाला देत जावा, असे आवाहन त्यांनी केले.
शाळा सुरक्षा परिषद कार्यक्रमासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सुमारे १२०० शाळांमधील सुमारे २४०० मुख्याध्यापक, सचिव असे सहभागी झाले होते.
पोलीस आयुक्तअमितेश कुमार,पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग, संपत सुर्यवंशी ,शिक्षणाधिकारी (माध्यमिक) पुणे जिल्हा परिषद डॉ. भाऊसाहेब कारेकर ,अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग,मनोज पाटील,,अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, प्रविणकुमार पाटील, , परिवहन अधिकारी ,श्रीमती अर्चना गायकवाड ,पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, पंकज देशमुख,,पोलीस उपआयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे . पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, ,संदीपसिंह गिल, ,पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, ,पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३. ,संभाजी कदम, ,पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४. ,हिम्मत जाधव, ,पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५. ,आर. राजा, पोलीस उप आयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर, श्री.जी. श्रीधर, हे व यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या यांच्या बहुमुल्य सहकार्यामुळे आजचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आहे