पुणे-मालवणमधील राजकोट किल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ आठ महिन्यामध्येच अचानक दुर्घटनाग्रस्त झाला आहे. हा पुतळा उभारताना अनेक अक्षम्य त्रुटी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे म्हणून सदर दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी यांच्यावतीने एस एस पी एम एस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यााखाली मुक निदर्शने करण्यात करण्यात आली यावेळी शहर अध्यक्ष दीपक मानकर यांच्याकडून , यापुढे अशाप्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून सर्वच पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ॲाडीट करण्याची मागणी जिल्हाधिकारी सुहास दिवसे आणि महापालिका आयुक्त डॉ. राजेन्द्र भोसले यांच्याकडे करण्यात आली.
राजकोट किल्यावरील पुतळ्याच्या उभारणीमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी तसेच भविष्यामध्ये अश्या दुर्घटना पुन्हा घडू नयेत याची खबरदारी घेण्याची मागणी यावेळी पक्षाच्या वतीने शासनाकडे करून पुढे शहराध्यक्ष दिपक मानकर म्हणाले झालेला प्रकार हा खुप वेदनादायक व चिड आणणारा आहे, दोषींवर कडक कारवाई करून त्यांना कठोर शासन झाले पाहीजे व सदर जागी सर्व भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून पुन्हा पुतळा बसवावा
सरकार मध्ये सहभागी असतानाही हे आंदोलन का करीत आहात असे पत्रकारांनी विचारले असता कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख म्हणाले छत्रपतींच्या अस्मितेकरीता सत्ता नसताना सुद्धा लढत होतो व सरकार असताना सुद्धा यापुढेही लढत राहणार सरकारे येतील जातील छत्रपतींसाठी शेकडो सरकारे कुर्बान परंतू युगपुरुष छत्रपती शिवाजी महारांचा अनादर कधीच सहन केला जाणार नाही.
सदर प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते यांनी तोंडाला काळ्या फिती लावून आंदोलन केले . दिपक मानकर , प्रदीप देशमुख , प्रमोद निम्हण ,दत्ता सागरे , अब्दुल सत्तार ,गौरी जाघव श्रीधर स्वामी ,शिवाजी पाडाळे ,शितल जवंजाळ , विपूल म्हैसुरकर , लावण्या शिंदे , तेजल दुघाने व इतर कार्यकर्तै मोठ्या संखेने उपस्थित होते.